डॉ. आंबेडकर जयंती उत्सव १४ व १५ एप्रिल रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:39 PM2018-04-12T21:39:09+5:302018-04-12T21:39:09+5:30

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ व १५ एप्रिल रोजी दोन दिवसीय जयंती महोत्सव ‘शौर्य पर्व २०१८’ म्हणून सुभाष शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dr. Ambedkar Jayanti celebrations on 14th and 15th of April | डॉ. आंबेडकर जयंती उत्सव १४ व १५ एप्रिल रोजी

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव १४ व १५ एप्रिल रोजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ व १५ एप्रिल रोजी दोन दिवसीय जयंती महोत्सव ‘शौर्य पर्व २०१८’ म्हणून सुभाष शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेला उत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश गजभिये, उपाध्यक्ष सावन डोये, अमर राऊत, सिद्धार्थ चंद्रिकापुरे, मनोज खोब्रागडे, सचिव रोशन गेडाम, गोलू सावंत, गोलू डहाट व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी (१३) रात्री १२ वाजता आंबेडकर चौकात आतिषबाजी करण्यात येईल. शनिवारी (१४) सकाळी ८ वाजता बुद्धवंदना व महारॅलीला डॉ. आंबेडकर चौक तहसील कार्यालयाजवळून सुरूवात करण्यात येईल. सकाळी १० वाजता ‘प्रकाश सागर’ संगीतमय कार्यक्रम होईल. यात आंबेडकरी विचारवंत प्रा.पी.एन. चंगोले, अजाबशास्त्री व इंजि. किशोर बारमाटे प्रबोधन करणार आहेत.
रविवारी (दि.१५) सकाळी १० वाजता सुभाष शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश गजभिये यांच्या अध्यक्षतेत होईल.
यात सहआयुक्त धनंजय वंजारी, सहायक आयुक्त गौरव मेश्राम व गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलसचिव विनायक इळपाते मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २ वाजता प्रबोधन प्रशिक्षण शिबिर होणार असून अमरावतीचे धर्मेंद्र सरदार प्रशिक्षण देणार आहेत.
तर सायंकाळी ५ वाजता जेएनयू दिल्लीचे राहुल सोनपिपले यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता पंजाबमधील प्रसिद्ध प्रबोधनकार गीन्नी माही यांचे प्रबोधन होणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाºयांनी दिली.

 

Web Title: Dr. Ambedkar Jayanti celebrations on 14th and 15th of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.