डॉ. आंबेडकर चौकातून संविधान जनजागृती कार्यक्रमास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:08+5:302021-06-29T04:20:08+5:30

‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीचे प्रणेते बाबा आढाव यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय किर्तीचे भाषातज्ञ पद्यश्री डॉ. गणेश देवी, आ. कपिल ...

Dr. Commencement of Constitution Awareness Program from Ambedkar Chowk | डॉ. आंबेडकर चौकातून संविधान जनजागृती कार्यक्रमास प्रारंभ

डॉ. आंबेडकर चौकातून संविधान जनजागृती कार्यक्रमास प्रारंभ

Next

‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीचे प्रणेते बाबा आढाव यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय किर्तीचे भाषातज्ञ पद्यश्री डॉ. गणेश देवी, आ. कपिल पाटील यांच्या पुढाकाराने उपक्रमाचे आयोजन सर्वत्र होत असल्याची माहिती शिक्षक भारतीय विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर यांनी दिली. येथील डॉ. आंबेडकर चौकात आयोजित संविधान जागर कार्यक्रमात शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य व्ही. डी. मेश्राम, शिक्षक भारतीचे मार्गदर्शक कमलबापू बहेकार, शिक्षण विस्तार अधिकारी आर.पी. रामटेके, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश ब्राम्हणकर, शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरडे, डी. एस. टेंभुर्णे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भरत वाघमारे, प्यारेलाल जांभूळकर प्रामुख्याने उपस्थित होते. व्ही. डी. मेश्राम, विनायक येडेवार यांनी संविधानावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले. प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे यांच्यावतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संतोष कुसराम, संतोष मेंढे, माणिकचंद बिसेन यांनी सानेगुरुजींची ‘बलसागर भारत होवो’ ही प्रार्थना गायली. कार्यक्रमाला योगेश रामटेके, बाळू वंजारी, किशोर बहेकार, विलास डोंगरे, संजय तुरकर, लोकचंद कोकोडे, मुलचंद बहेकार, आर. एल. सांगोळे, अनिल मेश्राम, भूपेश टांगसे, जी. एस. नेताम, आर. एम. करंडे, आर. ई. खापर्डे, आनंद सोनवाने, डिगेश्वर टेंभरे, गणेश शिवणकर, विकेश डोंगरे, नरेश कोरे, जसपालसिंग चक्रेल, सी. डी. भांडारकर,मंगल गोंडाणे, विद्या शिंगाडे, प्रशांत रावते उपस्थित होते.

Web Title: Dr. Commencement of Constitution Awareness Program from Ambedkar Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.