डाॅ. आंबेडकरांनी विषमता नष्ट केली म्हणून माणसात आलो ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:29 AM2021-04-16T04:29:20+5:302021-04-16T04:29:20+5:30
अर्जुनी मोरगाव : अनेक काळ आम्ही व आमच्या पूर्वजांनी विषमतेच्या गुलामगिरीत राहिलो, अन्याय, अत्याचार व छळ केला हे ...
अर्जुनी मोरगाव : अनेक काळ आम्ही व आमच्या पूर्वजांनी विषमतेच्या गुलामगिरीत राहिलो, अन्याय, अत्याचार व छळ केला हे सोसले. मग कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रज्ञासूर्य आमच्या जीवनात येऊन विषमता नष्ट करुन आम्हाला माणसात आणले. तेव्हाच आम्ही सन्मानाचे जीवन जगू लागलो, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व विचारवंत प्रा. मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.
डाॅ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमस्थळी मंगला सुरेंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अनिल दहीवले,उज्ज्वला कांबळे, प्रभाकर दहीकर, नितीन तागडे, शिशुपाल डोंगरे, उमेश बोरकर, बालक बोरकर, युवराज बोरकर, तिलोतमा खोब्रागडे, चंदू तागडे, निवेश बोरकर, कुंजीलाल रामटेके, सुरेश खोब्रागडे, गुणवंता बोरकर, वासुदेव तागडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासनाच्या नियमानुसार अंतर ठेऊन मास्क लावून वैचारिक संघर्ष सामाजिक व सांस्कृतिक मंच येरंडी-देवलगाव के.एस.चौकात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार मयुर खोब्रागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सम्यक बोरकर, सचिन कांबळे, मनमित कांबळे, हितेश बोरकर, रोहित कांबडे, करीम गेडाम, गौरव खोब्रागडे, सुहास बोरकर, वृषभ गेडाम, अक्षय तागडे यांनी सहकार्य केले.