दर्रेकसा आरोग्य केंद्राकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: August 20, 2014 11:37 PM2014-08-20T23:37:51+5:302014-08-20T23:37:51+5:30
येथील अतिमागास व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त परिसरात शासनाने गोरगरीब लोकांसाठी आरोग्य सेवा नियमितपणे मिळण्यासाठी दर्रेकसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उघडलेले आहे.
दर्रेकसा : येथील अतिमागास व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त परिसरात शासनाने गोरगरीब लोकांसाठी आरोग्य सेवा नियमितपणे मिळण्यासाठी दर्रेकसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उघडलेले आहे. या केंद्रांतर्गत परिसरातील २५ ते ३० गावांचा समावेश आहे. येथे नेहमीच अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे या परिसरात आजारांचे प्रमाण वाढत आहे. मलेरिया, डेंगू, अतिसार व विविध प्रकारच्या आजारांमुळे लोकांना खूप त्रास होत आहे.
दर्रेकसा आरोग्य केंद्रात दुसऱ्या केंद्राप्रमाणे कर्मचाऱ्यांची कमी असल्यामुळे २५ ते ३० गावांतील जनतेसाठी सरकारी कर्मचारी कमी पडत आहेत. लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास अडथळा होत आहे. या क्षेत्राप्रमाणे दोन वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. पण येथे एकच अधिकारी असल्यामुळे त्यांना आजार तपासण्याकरिता कधी-कधी परत जावे लागते. तसेच येथे एक महिला डॉक्टरची नितांत गरज आहे. तसे एक आयपीएसएच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन आरोग्य सेवक आणि तीन अधिपरिचारिकांची या केंद्राला गरज आहे. या पदांची नियुक्ती लवकरच लवकर करण्यात यावी, अशी येथील जनतेने मागणी केली आहे. या केंद्राकडे वरिष्ठांचे लक्ष नाही तर जनप्रतिनिधी हे ही समस्याला विसरून गेले आहेत. शासनाने तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रात सातगाव येथे दोन डॉक्टर, कावराबांध येथे दोन डॉक्टर बिजेपार येथे तीन डॉक्टर कार्यरत आहेत. पण दर्रेकसा येथे एकच डॉक्टर आहे. सहकर्मचारी नसल्यामुळे परिसरात आजारांचे प्रमाण आटोक्यात आणने कठिण होत आहे. मलेरिया, अतिसार, डायरिया, डेंगू व क्षयरोग या आजारांना नियंत्रित ठेवण्याकरिता येथील रिक्त पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. या समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे व येथे एका एमबीबीएस महिला डॉक्टरची त्वरीत नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.