बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:11 PM2019-06-11T22:11:15+5:302019-06-11T22:11:37+5:30

जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

Dream of bringing the water of the tiger river to the field | बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न

बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुक्यातील छिपिया येथे विविध कामांना सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. भविष्यात बाघ नदीवर डांर्गोलीजवळ ४०० कोटी रुपयांच्या निधीतून बॅरेज तयार करुन या भागातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे आपले स्वप्न असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे सांगितले.
तालुक्यातील छिपीया येथील २५ लाख रुपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण व सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सदस्य कुंदन कटारे, विजय लोणारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, सत्यम बहेकार, हुकुम नागपूरे, टिकाराम भाजीपाले, महेंद्र गेडाम, शालू परतेती, चेतन बहेकार, अनिरुध्द तांडेकर उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले, बाघ प्रकल्पाच्या बॅरेजमुळे गोंदिया तालुक्यातील शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येईल. तसेच शेतकºयांना दोन्ही हंगामात पिके घेणे शक्य होईल.यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. परिसरातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी बाघ सिंचन प्रकल्पाच्या नहरांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले असून याची शेतकºयांना मदत होणार असल्याचे सांगितले. या वेळी विविध कामांचे भूमिपूजन आ.अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Dream of bringing the water of the tiger river to the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.