‘त्या’ बोअरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग होतो काळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:00 AM2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:02+5:30
तालुक्यातील बागळबंद जंगल परिसरात गोरेगाव तिरोडा मार्गावर काली माता मंदिर आहे.या मंदिराजवळ एक बोअरवेल आहे. भाविकांना तहान लागल्यास याच बोअवेलचा आधार घेतात. या काली माता मंदिरला लागूनच फुटक्या तलाव आहे. काही वर्षांपूर्वी या तलाव परिसरात लग्न सोहळयासाठी वरात गेली होती. मात्र रात्री उशिर झाल्याने त्या वरातीतील सर्वांनी फुटक्या तलावाजवळ मुक्काम केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील बागळबंध येथील काली माता मंदिर परिसरातील एका बोअरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग काळा होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे गावकऱ्यांकडून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहे. मात्र बरेच दिवसांपासून बोअरवेलचा वापर बंद असल्याने अथवा रासायनिक घटकांमुळे हे शक्य असल्याचे मत भूजल तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील बागळबंद जंगल परिसरात गोरेगाव तिरोडा मार्गावर काली माता मंदिर आहे.या मंदिराजवळ एक बोअरवेल आहे. भाविकांना तहान लागल्यास याच बोअवेलचा आधार घेतात. या काली माता मंदिरला लागूनच फुटक्या तलाव आहे. काही वर्षांपूर्वी या तलाव परिसरात लग्न सोहळयासाठी वरात गेली होती. मात्र रात्री उशिर झाल्याने त्या वरातीतील सर्वांनी फुटक्या तलावाजवळ मुक्काम केला होता. पण त्याच रात्री तलावाची पाळ फुटल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासूनच त्या तलावाचे नाव फुटक्या तलाव पडल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर पहाडीवर काली मातेचे मंदिर उभारण्यात आले.
सद्यस्थितीत काली माता मंदिर परिसरात भक्त येतात. हे काली माता मंदिर जवळपास १५० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. १९९७ मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती विजय राणे यांनी या मंदिर परिसरात एका बोअरवेल व्यवस्था करुन दिली. १ आॅक्टोबर रोजी या बाअेरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग काळा होत असल्याचा प्रकार पुढे आला. सध्या या प्रकाराची परिसरात चर्चा आहे.
बोअरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग काळा होत असल्याची माहिती गावकºयांकडून मिळाली. हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
- विजय राणे, माजी सभापती गोरेगाव
..............................................................
बोअरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग काळा होणे यामागे विविध कारणे असू शकतात. आयोडीन, आयरन, टॉक्झीक मेटल यांचे प्रमाण जास्त असेल तर जिभ काळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोअरवेलच्या पाण्याचा कमी वापर होत असेल तर असे होणे शक्य आहे. भूगर्भातील पाणी आणि बोअरवेलचे जंग लागलेले लोखंडी पाईप यात रासायनिक प्रक्रि या झाली असेल तर पाणी पिल्याने जिभेचे रंग काळा होण्याची शक्यता आहे. मात्र पाण्याचे नमुने तपासल्यानंतर नेमका काय प्रकार हे निश्चित सांगता येईल.
- दिनेश वाघमारे, केमिस्ट,उपविभागीय प्रयोगशाळा गोरेगाव,
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा गोंदिया.