गाडी जपून चालवा; जीवघेणी १० ठिकाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:28 AM2021-02-13T04:28:02+5:302021-02-13T04:28:02+5:30
गोंदिया : वारंवार एकाच ठिकाणी अपघात होऊन त्यात वाटसरूंचा बळी जात असेल, तर अशा ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हणून संबोधले ...
गोंदिया : वारंवार एकाच ठिकाणी अपघात होऊन त्यात वाटसरूंचा बळी जात असेल, तर अशा ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हणून संबोधले जाते. गोंदिया जिल्ह्यात अशी १० ब्लॅक स्पॉट आहेत. या ब्लॅक स्पॉटवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या ब्लॅक स्पॉटवर अपघात घडल्यावर मृत पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत नैनपूर, तिराेडा पोलीस ठाण्यांतर्गत मुंडीकोटा, तिराेडाचा सहकारनगर, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत एकोडी पेट्रोलपंप, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत कुंभीटोला बाराभाटी डांबर प्लांट, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत शिरपूरबांध, मासूलकसा घाटी, नवाटोला, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत गॅस गोडाऊन सालेकसा, तर रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बालाघाट टी पाइंट हे ब्लॅक स्पॉट म्हणून पोलिसांकडे नोंद आहेत. सन २०१९ या वर्षात या ब्लॅक स्पॉटवर २५ अपघात घडले आहेत. यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
बॉक्स
मागील वर्षी अपघातांची संख्या
जानेवारी-२०
फेब्रुवारी-१६
मार्च-२२
एप्रिल-७
मे-१२
जून-१५
जुलै-२०
ऑगस्ट-१३
सप्टेंबर-१२
ऑक्टोंबर-३०
नाेव्हेंबर-२३
डिसेंबर-२८
.......
तालुकानिहाय ब्लॅकस्पॉटची ठिकाणे
सडक-अर्जुनी- १
तिराडो-२
गोंदिया- २
अर्जुनी-मोरगाव-१
देवरी-३
सालेकसा-१
.........
ब्लॅक स्पॉटवर २४ बळी
जिल्ह्यातील १० ब्लॅक स्पॉटवर सन २०१९ मध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैनपूर येथे ४, मुंडीकोटा येथे ३, सहकारनगर ४, एकोडी पेट्रोलपंप २, बाराभाटी डांबर प्लांट २, शिरपूरबांध १, मासुलकसा घाटी ४, गॅस गोदाम सालेकसा येथे २ व बालाघाट टी पाइंट येथे २ अशा २४ जणांचा मृत्यू ब्लॅक स्पॉटवर झाला आहे.
बॉक्स
या ठिकाणी गाडी जपून चालवा
नैनपूर, मुंडीकोटा, सहकारनगर, एकोडी पेट्रोलपंप, बाराभाटी डांबर प्लांट, शिरपूरबांध, मासुलकसा घाटी, गॅस गोदाम सालेकसा, नवाटोला व बालाघाट टी पाइंट या १० ठिकाणी अत्यंत सावधपणे वाहन चालविणे आवश्यक आहे.