वाहन चालकांचे उत्पन्न घटले; खर्च वाढला! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:47+5:302021-05-23T04:28:47+5:30

गोंदिया : काेराेना संसर्गामुळे भाड्याने प्रवासी वाहन देण्याचा व्यवसाय जवळपास ठप्प पडला आहे. त्यामुळे वाहनाच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे ...

Driver's income decreased; Cost increased! (Dummy) | वाहन चालकांचे उत्पन्न घटले; खर्च वाढला! (डमी)

वाहन चालकांचे उत्पन्न घटले; खर्च वाढला! (डमी)

Next

गोंदिया : काेराेना संसर्गामुळे भाड्याने प्रवासी वाहन देण्याचा व्यवसाय जवळपास ठप्प पडला आहे. त्यामुळे वाहनाच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न वाहनमालकांसमाेर पडला आहे. व्याजाच्या कर्जावरील व्याज माफ करा अशी मागणी होत आहे.

राेजगाराच्या उद्देशाने काही बेराेजगार युवकांनी सुमाे, स्काॅर्पिओ, झायलाे, बाेलेराे, कार वर्गातील व मालवाहतूक वाहने खरेदी करून व्यवसाय सुरू केला. बहुतांश जण चालक व मालक स्वत:च आहेत. ही सर्वच वाहने १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहेत. बहुतांश वाहने फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून घेण्यात आली आहेत. काेराेनामुळे मागील वर्षीही लाॅकडाऊन होते. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभामध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. मागील वर्षभरापासून उत्पन्न ठप्प पडले असल्याने कर्जाचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न वाहन मालकांपुढे उपस्थित झाला आहे.

बाॅक्स

वाहने सुरू पण गॅरेज बंद

वाहन क्षमतेच्या निम्मे प्रवासी बसवून प्रवास करण्यास शासनाने परवानगी दिली आहे; मात्र गॅरेज व ऑटाेमाेबाईलची दुकाने बंद आहेत. एखादेवेळी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्ती करण्यास अडचण निर्माण हाेत आहे. सामानही मिळत नसल्याने थाेडाफार जरी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास ते घरीच ठेवावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने काम मिळाले तरी करता येत नाही.

..................................................

वाहनचालकांसमाेर अडचणींचे डाेंगर

संचारबंदीमुळे वाहन बंद राहिले तरी वाहनाची देखभाल व दुरुस्ती करावीच लागते. त्यामुळे वाहनाचा किमान खर्च सुरूच राहतो. हा खर्च न केल्यास वाहन बंद पडण्याची शक्यता राहते. कर्ज काढून वाहन खरेदी केले आहे. कर्जाचे हप्ते लाखाेंच्या घरात आहेत. हे हप्ते कसे भरावे असा प्रश्न वाहन मालकांसमाेर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेही वाहनचालकांचा राेजगार हिरावला आहे.

.........................

--वाहने पाॅईंटवर मात्र ग्राहक मिळेना--

दिवसातून एखादा तरी ग्राहक मिळेल या आशेने वाहन शहराच्या पाॅईंटवर लावत आहे; मात्र ग्राहकच मिळत नाही त्यामुळे आम्ही हतबल झालाे आहाेत. दुसऱ्या जिल्ह्यात साेडण्यासाठी ई-पास काढलेला एखादा व्यक्ती मिळतो. लाॅकडाऊनमुळे वाहनांचा व्यवसाय जवळपास ठप्पच पडला आहे. पोट भरणे कठीण झाले आहे.

राधेशाम बहेकार, वाहन चालक-मालक, आमगाव.

.......

उच्च शिक्षण घेऊनही हाताला नोकरी नसल्याने स्वत:च कर्ज काढून मालवाहन घेतले. वर्षभरापासून या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीतील स्थिती लक्षात घेता कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत वाढवून द्यावी.

आशिष तलमले, वाहन चालक-मालक पदमपूर.

........................

--गॅरेजवाल्यांचे पाेट-पाणी बंद--

दीड महिन्यापासून गॅरेज बंद आहे. दरराेज येणाऱ्या उत्पन्नातून घर चालवायचे; मात्र दुकानच बंद असल्याने राेजीराेटी थांबली आहे. मागील महिनाभरापासून आम्ही कसे जीवन जगत आहाेत हे आम्हालाच माहिती. शासनाने मदत करावी.

दिनेश चिंचाळकर, गॅरेज मालक

.......................

संचारबंदीतही वाहन हे अत्यावश्यक वस्तू झाली आहे. मंत्री, जिल्हाधिकारी व इतर सर्वसामान्य सर्वच नागरिक संचारबंदीतही वाहनाचा वापर करीत आहेत. वाहन बिघडल्यास त्यांचे कामकाजच ठप्प पडू शकते. गॅरेजचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची गरज होती. परंतु तसे केले नाही.

- भागरथाबाई फुंडे, गॅरेज मालक

.............................

कार- ४०००

जीप-३००

दुचाकी- ३००००

रिक्षा- १८००

ट्रक - ४००

रुग्णवाहिका- १६

Web Title: Driver's income decreased; Cost increased! (Dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.