टाेळधाडीचे ड्रोनव्दारे व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:30 AM2021-03-16T04:30:10+5:302021-03-16T04:30:10+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.एन.एस.देशमुख होते. उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी मागील वर्षी जूनमध्ये गोंदिया व तिरोडा तालुक्यात झालेल्या टोळधाड ...

Drone Management Training Workshop | टाेळधाडीचे ड्रोनव्दारे व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

टाेळधाडीचे ड्रोनव्दारे व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.एन.एस.देशमुख होते. उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी मागील वर्षी जूनमध्ये गोंदिया व तिरोडा तालुक्यात झालेल्या टोळधाड प्रादुर्भावाचे स्वरूप व नियंत्रणाविषयी माहिती दिली. टोळधाड नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला आरसीआयपीएम नागपूर येथील डॉ.ए.बोहरीया, यांनी वाळवंटी टोळधाड या किडीची ओळख, इतिहास, जीवनक्रम, उपाययोजना, सर्वेक्षण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेनंतर गरुडा एरोस्पेस प्रा.लि. चेन्नई यांचे संचालक पी.रामकुमार यांनी ड्रोनच्या साहाय्याने फवारणीबाबत मार्गदर्शन करून त्याचे प्रात्यक्षिक कृविकेच्या प्रक्षेत्रावर दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.जी.पवार, विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) यांनी केले, तर आभार आर.डी.चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास आरसीआयपीएम नागपूरचे डॉ.नायक व डॉ.गिरीश, तसेच कृषी विभागाचे डी.एल.तुमडाम, मोहाडीकर व कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी व कृषी विज्ञान केंद्रातील एम.व्ही.भोमटे, जी.आर.खेडीकर, आर.पी.चव्हाण व एस.बी.गवते उपस्थित होते.

Web Title: Drone Management Training Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.