मादक द्रव्याची नशा, अनमोल जीवनाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:44+5:302021-06-28T04:20:44+5:30

तालुका विधिसेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त वतीने न्यायालय सभागृहात आयोजित जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ...

Drug addiction, the misery of precious life | मादक द्रव्याची नशा, अनमोल जीवनाची दुर्दशा

मादक द्रव्याची नशा, अनमोल जीवनाची दुर्दशा

Next

तालुका विधिसेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त वतीने न्यायालय सभागृहात आयोजित जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.के. लंजे, ॲड.सुरेश गिऱ्हेपुंजे, ॲड.डी.एस. बन्सोड उपस्थित होते. पुढे बोलताना न्या.आव्हाड यांनी, २६ जून हा दिवस अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून का साजरा करतात, तसेच भारतात एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार (नार्कोटिक ड्रग्ज ॲन्ड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ॲक्ट-१९८५) नशिले पदार्थ वापरणे, बाळगणे, साठवणूक करणे, वाहतूक करणे, त्याची तस्करी करणे गुन्हा असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकातून ॲड.गिऱ्हेपुजे यांनी, अमली पदार्थ सेवन केल्याने जीवनाचा कसा ऱ्हास होतो, अमली पदार्थ आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात, अमली पदार्थांचे सेवन करणे किती घातक असते, त्यामुळे शरीरावर काय-काय परिणाम होतात, याबद्दल मार्गदर्शन केले. ॲड.लंजे यांनी, अमली पदार्थ म्हणजे काय? त्याची सवय कशी लागते? अमली पदार्थाची तस्करी कुठून होते़? तसेच कायद्यामध्ये त्याबाबत काय-काय तरतुदी आहेत, देशामध्ये अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गुन्हे याबाबत मार्गदर्शन केले. पुढे सर्व उपस्थितांना अमली पदार्थ सेवन न करण्याबद्दल शपथ देण्यात आली. आभार ॲड.डी.एस. बन्सोड यांनी मानले. संचालन ॲड.ओ.एस. गव्हाणे यांनी केले. कार्यक्रमासाठी सहायक अधीक्षक भालेराव व संपूर्ण न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Drug addiction, the misery of precious life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.