रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे शहरवासीयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:59 PM2019-08-07T23:59:13+5:302019-08-07T23:59:49+5:30

दिवसेदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा तोडगा दिसून येत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य केली आहे. असे असतानाही शहरात नवीन बांधकाम केले जात असताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

Dude's back to Rainwater Harvesting | रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे शहरवासीयांची पाठ

रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे शहरवासीयांची पाठ

Next
ठळक मुद्देगोंदिया : बंधनकारक असूनही शहरवासीयांचा प्रतिसाद नाही, अनामत रक्कम घेऊन दिली जाते मंजुरी

कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवसेदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा तोडगा दिसून येत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य केली आहे. असे असतानाही शहरात नवीन बांधकाम केले जात असताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केली जात नसल्याचे दिसून येत आहे. यातून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे शहरवासीयांनी पाठ केल्याचे दिसून येत आहे.
पाण्याचा वापर होत असताना मात्र पाणी साठवून व जिरवून ठेवण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी पाणी टंचाई रौद्र रूप धारण करीत आहे. आपल्या वाड-वडिलांची पुण्याई असल्यामुळे आज आपल्याला पाणी मिळत आहे. मात्र आज आपण पाणी वाचविले नाही तर येणारी पिढी मात्र पाण्यासाठी तडफडणार अशी स्थिती आता निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे.
त्यामुळे पाणी टंचाईचा गंभीर विषय लक्षात घेत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे अनिवार्य केले आहे. शहरात आपल्या बांधकामादरम्यान ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणाऱ्यांना मालमत्ता कर मध्ये काही टक्के सुट देण्याचेही नगर परिषदेच्या विचाराधीन आहे.
मालमत्ता करात सूट विचाराधीन
पाणी टंचाई लक्षात नगर परिषदेने शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य केली आहे. याकरिता शहरवासीयांना प्रोत्साहीत करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ तसेच दोन झाड लावणाऱ्यांना मालमत्ता करात पाच टक्के सूट देणे नगर परिषदेच्या विचाराधीन आहे.
-अशोक इंगळे
नगराध्यक्ष, नगर परिषद, गोंदिया.

अनामत रक्कम आहे जमा
नगर परिषदेच्या नगर रचना विभागाकडून नवीन बांधकामासाठी मंजुरी घ्यावी लागते. या मंजुरीसाठी नगर परिषद विकास शुल्क, ‘रेन वॉटर हार्वेस्ंिटग’ व वृक्ष लागवड शुल्क अनामत रक्कम स्वरूपात घेते व बांधकामाला मंजुरी दिली जाते. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करविल्यानंतर त्याची पाहणी संबंधिताला अनामत रक्कम परत केली जाते. यानुसार नगर परिषदेने मागील पाच वर्षांत एक हजार एक बांधकामांना मंजुरी देऊन त्यांच्याकडून अनामत रक्कम घेतली आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, मागील वर्षांपासून नगर परिषदेकडे ही अनामत रक्कम पडून आहे. याचाच अर्थ मागील वर्षांत या बांधकामांत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची सोय करण्यात आलेली नाही. यातून शहरवासी आजही पाण्याची बचत करण्याप्रती जागरूक नसल्याचे दिसते.

प्रभागनिहाय जनजागृती करणार
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे आज अत्यंत गरजेचे झाले असून शहरवासीयांना आदर्श म्हणून नगर परिषद कार्यालयात हा प्रयोग केला जाणार आहे. याशिवाय शहवासीयांना जागरूक करण्यासाठी प्रभागनिहाय जनजागृती कार्यक्रम घेणार आहोत. मालमत्ता करात सुट देण्याचा विषयही विचाराधीन आहे.
- चंदन पाटील,
मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया

जल पुनर्भरणाचे हे आहेत फायदे
पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.
जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.
गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. बºयाच पद्धती या घर बांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी गरजेच्या आहेत.
निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.
जल पुनर्भरण केल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. यामुळे भविष्यातील पाणी टंचाईची समस्या सोडविता येणार आहे. कारण सर्वात जास्त पाणी जमिनीतूनच ओढले जात आहे.

Web Title: Dude's back to Rainwater Harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.