साईनाथ अ‍ॅग्री कंपनीतील राखेमुळे पिकांची राखरांगोळी

By admin | Published: February 19, 2017 12:16 AM2017-02-19T00:16:48+5:302017-02-19T00:16:48+5:30

धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या एका कंपनीतुन धूर, गरम राख व रसायनयुक्त पाणी यामुळे मागील तीन वर्षात

Due to the ashes of Sainath Agri Co. | साईनाथ अ‍ॅग्री कंपनीतील राखेमुळे पिकांची राखरांगोळी

साईनाथ अ‍ॅग्री कंपनीतील राखेमुळे पिकांची राखरांगोळी

Next

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ : तीन वर्षात शेतीचे लाखोंचे नुकसान
खरबी (नाका) : धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या एका कंपनीतुन धूर, गरम राख व रसायनयुक्त पाणी यामुळे मागील तीन वर्षात परिसरातील शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे.
कंपनीचा कोट्यवधींचा फायदा होत असला तरी या प्रकारामुळे शेतकरी मात्र लाखो रूपयाने तोटा सहन करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची मागणी करूनही कपंनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच प्रदूषण विभाग, कृषी विभाग व जिल्हाधिकारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराश आली आहे.
राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या खरबी व खराडी परिसरातील शेतकरी मागील बराच वर्षापासून धान, भाजीपाला, हिरवी मिरची, तुळ, सोयाबीन, कपाशी, हरभरा अशी इतर अनेक पिके घेतली जाते. आतापर्यंत सुरळीत सुरू असलेल्या शेतपिकांचा उत्पादनाचे काम मागील तीन वर्षाचा अडचणीत आले आहे. कोंडबा हिवसे यांच्या शेतीला लागून तीन वर्षापूर्वी साईनाथ अ‍ॅग्री इंडस्ट्रीज नावाने धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करण्याचा प्रकल्प उभारला गेला.
आधुनिक पद्धतीच्या या प्रकल्पामध्ये धान उकळून तांदूळ निर्मिती करण्यात येत असल्याने भट्टीसाठी विजेचा उपयोग केला जातो. जळालेल्या धानाच्या कोंड्याची गरम राख व बाहेर पडणारी धुळ ही लगतच्या शेतामध्ये पिकांवर जाऊन पडत असल्याने पिकांची नासाडी होत आहे. गरम राखेमुळे व धुरामुळे शेतातील पिके करपत आहे. शेतामधील पीक काळेकुट्ट पडले आहे.
शेतामध्ये मजूर काम करायला सुद्धा येत नाही. आल्यास मजूर दिवसभरात काळेकुट्टे होत असून शरीरावर इजा होण्याची शक्यता जास्त आहे. मागील तीन वर्षापासून शेतकऱ्याना हा त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ५० लाखांचे नुकसान सहन करावे लागल्याची खंत शेतकऱ्याचा मुलगा हरीचंद्र हिवसे यांने ‘लोकमत’ला सांगितले.
शेतकऱ्याने जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग, कृषी विभाग यांना मागील एका वर्षापूर्वीपासून तक्रार केली असून सुद्धा कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कारवाई होताना दिसत नसल्याने येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकऱ्यांनी कर्ज फेडावे की पोट भरावे असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे.
शेतकऱ्याने इच्छा मरणाची मागणीही केली आहे, असे शेतकऱ्याने बोलून दाखविले. लाखो रूपयांचे पीक देणारी शेती तीन भावाचे कुटूंब व शेतमजूरांच्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होती. मात्र उत्पादन येणे बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अखेरची आस म्हणून २० फेब्रुवारीला होणाऱ्या जनता दरबारामध्ये आपले प्रकरण सादर करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. न्याय मिळावा या अपेक्षेवर शेतकरी काळवंटलेल्या पिकांकडे पाहून दिवस काढीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to the ashes of Sainath Agri Co.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.