उमेद अभियानामुळे महिलांचे जीवनमान उंचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:23 PM2018-04-11T22:23:00+5:302018-04-11T22:23:00+5:30
शासनाच्या विविध योजनांमार्फत आजच्या महिला चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी बचत गटामार्फत आपले जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : शासनाच्या विविध योजनांमार्फत आजच्या महिला चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी बचत गटामार्फत आपले जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाान ‘उमेद’ अंतर्गत बोंडगावदेवी येथील मिलिंद समाज मंदिरात मैत्री ग्राम संघ व स्वराज प्रभाग संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयाचे उद्घाटन जि.प. सदस्य पाऊलझगडे यांच्या हस्ते, उपसरपंच वैशाली मानकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हूणन सरपंच राधेशाम झोडे, पोलीस पाटील मंगला रामटेके, रिता डडमल, रंजना बोरकर, योगीता मेश्राम, दिपीका गजभिये, डोंगरवार, डोंगरे, मेश्राम, नलू तरोणे, मिना मेश्राम, लता वालदे, स्रेहलता राऊत आदी उपस्थित होते.
बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी १९९८ पासून केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या गटांना राज्य व केंद्र सरकार अत्यल्प व्याजदराने अर्थसहाय्य पुरवते. तसेच बचत गटांसाठी विविध विकास योजना आखल्या आहेत. त्याचा लाभ ग्रामीण भागातील महिला पुरुषांप्रमााणे घेत आहेत. महिला स्वयंसहायता गटामुळे सामाजिक व आर्थिक विकासात सहभागी होत आहेत. त्यामुळे गावागावात ग्राम संघांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातच बोंडगाव (देवी) परिसरातील १४ गावे मिळून एक स्वराज प्रभाग संघ निर्माण करण्यात आले आहे. त्याच संघाचे कार्यालय मिलिंद समाज मंदिर बोंडगावदेवी येथे स्थापन करण्यात आले आहे.
प्रास्ताविक रिता डडमल यांनी केले. संचालन हेमलता बोरकर यांनी केले. आभार भूमिता गोंधळे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी ईशा रामटेके, अर्चना रामटेके, दुर्गा झोडे, चेतना रामटेके, छाया मानकर, आशा शहारे, पुष्पकला बरैय्या, जयश्री मेश्राम आणि बाहेर गावावरुन आलेल्या सर्व बचत गटातील सदस्यांनी सहकार्य केले.