कोरोनामुळे रामनवमी साधपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:04+5:30
कोरोनाने सर्व जगाला झपाटले असून सध्या कुणाचेही चित्त ठिकाण्यावर राहीलेले नाही. देशातही तीच स्थिती असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून अवघ्या देशातच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. परिणामी लोकांना घराबाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र शुकशुकाट असून सर्वत्र कोरोनाच्याच चर्चा सुरू आहेत. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या हिंदू धर्मीयांच्या सणांवर होत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुळे अवघ्या जगातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर देशातील सणासुंदीवरही कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनामुळे दरवर्षी निघणारी रामनवमी शोभायात्रा यंदा रद्द करण्यात आली. त्या ऐवजी शहरवासीयांनी आपापल्या घरीच पूजा करून सायंकाळी दीप प्रज्वलन करून रामनवमी साजरी केली.
कोरोनाने सर्व जगाला झपाटले असून सध्या कुणाचेही चित्त ठिकाण्यावर राहीलेले नाही. देशातही तीच स्थिती असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून अवघ्या देशातच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. परिणामी लोकांना घराबाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र शुकशुकाट असून सर्वत्र कोरोनाच्याच चर्चा सुरू आहेत. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या हिंदू धर्मीयांच्या सणांवर होत असल्याचे चित्र आहे.
२५ मार्चपासून नवरात्रीला सुरूवात झाली असून ‘लॉकडाऊन’मुळे नवरात्री कशी निघून हेच कळले नाही. विशेष म्हणजे, दरवर्षी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने येथील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापन केली जाते. रामनवमीच्या दिवशी शहरात शोभायात्रा काढली जाते. त्याचप्रकारे श्री रामजन्म उत्सव समितीच्यावतीनेही शोभायात्रा काढली जाते. मात्र यंदा रामनवमी शोभायात्रेवर कोरोनाचे सावट दिसून आले. परिणामी शोभायात्रा रद्द करण्यात आल्या. कोरोनामुळे यंदा बजरंग कार्यालयातच श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. गुरूवारी (दि.२) रामनवमीनिमित्त पूजा अर्चा करून रामजन्म साजरा करण्यात आला.
दीप प्रज्ज्वलनाने शहर प्रकाशमान
कोरोनामुळे रामनवमी शोभायात्रा रद्द करण्यात आली असली तरीही शहरवासीयांनी आपल्या घरीच रामजन्म साजरा करून सायंकाळी दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी ७.३० वाजता शहरवासीयांनी आपापल्या घरीच दीप प्रज्वलित करून रामजन्मोत्सव साजरा केला.