परिसरात दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 10:18 PM2017-08-06T22:18:06+5:302017-08-06T22:18:36+5:30

Due to drought in the area | परिसरात दुष्काळाचे सावट

परिसरात दुष्काळाचे सावट

Next
ठळक मुद्देश्री संत बह्याबाबा यांच्या जन्माने पवित्र झालेले व दोन हजार लोकसंख्या असलेल्या केसलवाडा व परिसरातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
केसलवाडा : श्री संत बह्याबाबा यांच्या जन्माने पवित्र झालेले व दोन हजार लोकसंख्या असलेल्या केसलवाडा व परिसरातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गावाला लागून लेदडा, बयवाडा, खोपडा, येडमाकोट, मनोरा, सेलोटपार, खैरी, मुरपार ही गावे आहेत. या सर्व गावांची मिनी बाजारपेठ असलेले गाव म्हणजे केसलवाडा. केसलवाडा आणि परिसरातील जवळपासच्या गावांतील ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु सध्या अर्धा पावसाळा सुरु असतानाही पावसाअभावी शेतकºयांची धान रोवणी पूर्ण झालेली नाहीत. मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. केसलवाडा येथे कृषी सहायक रहांगडाले यांनी पावसाअभावी वाळलेल्या व करपलेल्या रोपांची पाहणी केली. तसेच संपूर्ण धानाचे रोप वाळलेले व करपलेले आहेत याची शेतावर जाऊन प्रत्यक्ष खात्री करुन घेतली.
या मौका तपासणीच्या वेळी सरपंच बबन कुकडे, कृषी सहायक रहांगडाले, ग्रा.पं. सदस्य छत्रपती चौधरी, गुलाब कुकडे, कैलास शेंडे, तेजराम मारवाडे, प्रमोद वानखेडे व इतर गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Due to drought in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.