चारा पिकांच्या लागवडीतून करणार चारा टंचाईवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:00 PM2017-12-12T23:00:51+5:302017-12-12T23:01:33+5:30
जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात. जिल्ह्यात ३ लाखांवर पशुधन असून त्यांच्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याची समस्या निर्माण होवू नये, यासाठी जि.प. पशुसंवर्धन विभागाने शेतकºयांना चारा पिकाच्या लागवडीकरिता मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले. दोन हजारावर शेतकऱ्यांनी चारा लागवड केल्याने चार टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.
यंदा कमी पावसामुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तणस देखील कामी येणार नाही.
परिणामी निर्माण होणारी चारा टंचाईची समस्या लक्षात घेवून जि.प.पशुसंवर्धन विभागाने त्याचे पूर्व नियोजन केले आहे.
चाºयाअभावी दुग्ध उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. पशुसंवर्धन विभागाच्या वैरण विकास कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना चारा लागवडीचा सल्ला देण्यात आला. पाण्याअभावी यंदा जिल्ह्यात रब्बी पिक घेता येणे शक्य नसल्यामुळे शेतकºयांनी कमी पाण्याच्या चारा पिकाचे उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चारा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक पंचायत समितीला बियाणे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला.
पंचायत समितीने ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वळते केले. प्रत्येक शेतकऱ्याला चारा बियाणे खरेदीसाठी ६६६ रूपये देण्यात आले. जनावरांची चाऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे २० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती.
यापैकी १४ लाख रुपयांचा निधी शासनाने दिला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता केला आहे.
जनावरांसाठी चाºयाची समस्या निर्माण होवू नये, यासाठी ओलीताची सोय असणाºया शेतकºयांना चारा उत्पादनासाठी बियाणे उपलब्ध करुन देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे चारा टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे.
- राजेश वासनिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. गोंदिया.