अतिवृष्टीने १५ गावांत ९४ घरांची पडझड
By admin | Published: July 27, 2014 12:11 AM2014-07-27T00:11:15+5:302014-07-27T00:11:15+5:30
सतत येत असलेल्या पावसाने दोन दिवसात पंधरा गावात ९४ घराची पडझड झाली. यात चांदोरी खुर्द ३, बिहीरीया १, करटी बु.१०, करटी खुर्द ४, अर्जुनी ६, सेजगाव ५, सोनेगाव ९, नहरटोला २,
परसवाडा : सतत येत असलेल्या पावसाने दोन दिवसात पंधरा गावात ९४ घराची पडझड झाली. यात चांदोरी खुर्द ३, बिहीरीया १, करटी बु.१०, करटी खुर्द ४, अर्जुनी ६, सेजगाव ५, सोनेगाव ९, नहरटोला २, बोदा १०, अत्री १०, बाघोली २, बोरा ७, इंदोरा बु. ७, परसवाडा १०, गोंडमोहाडी ८ या गावात घराची पडझड झाली. तलाठी यांनी फोटो घेऊन पंचनामे करणे सुरू झाले आहे.
गेल्या तीन दिवसापासून सतत पावसमुळे परसवाडा महसूली मंडळ विभागात २३ जुलैला सर्वाधिक पाण्याची १५३ मिली नोंद घेण्यात आली.मोठ्या प्रमाणात पाण्याने परिसराला वेढले होते. नदी, नाले, तुडुंब भरून वाहत होते. मागील वर्षी याच तारखेला म्हणजे २३ जुलैला ८५.३ मिली पाऊस पडला होता. यावर्षी दुप्पट पडला. परिसरात सतत दोन्ही दिवस २२ जुलैला ७३ मिली पाऊस पडला. चांदोरी खुर्द, बघोली, ढिवरटोली, किडंगीपार रस्ता पाण्यने वेढल्याने गावाचा संपर्क तुटला होता.
मध्यप्रदेश, खैरी, खैरलांजीला जाणाऱ्या रस्त्यावर खैरी गावाजवळ नाल्यावर सात फुट पाणी असल्याने तिरोडा-बालाघाट एस.टी.बस सेवा बंद करण्यात आली होती. शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कामे खोळंबली होती. पाणी निघण्यासाठी दोन दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार.
काही ठिकाणी नर्सरी धानाचे नुकसान झाले व रोवणी केलेल्या पऱ्हे सडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. परसवाडा येथे राजस्व कार्यालय असून प्रभारी अधिकारी वाहने यांच्याकडे कार्यभार आहे. त्यांच्याकडे राजस्व विभाग आहे किंवा नाही त्यांनाच जाणीव नाही.
पूर परिस्थिती, घराची पडझड, अतिवृष्टी बदल दूरध्वनीव्दारे संपर्क केले असता. मला यांची कल्पना नाही, मी काहीच सांगू शकत नसल्याने ते म्हणाले.
तहसील कार्यालयाचे राऊत यांच्याशी विचारपूस केल्यास त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मंडळ अधिकारी महिन्यातून एकदा अचानक येत असल्याचे विश्वसनीय सुत्रामाहिती मिळाली आहे. परसवाडा साझा क्र.चे कोतवालच येत नसून महिला तलाठी यानाच सर्व कामे करावी लागत आहेत. ते मुख्यालयात राहत असल्याने त्याच्याकडे पर्जन्यमान मोजमाप करण्याचे काम तहसीलदाराने दिले आहे.
यासंदर्भात तलाठी एस.एम.बारसे यांनी तहसीलदाराला यासंदर्भात माहिती दिली. मात्र तहसीलदार याकडे दुर्लक्षपणा करीत आहेत. कामचुकार अधिकारी कोतवाल यांच्यावर उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अतिवृष्टीत घरे पडली, शेतीचे व पिकाचे नुकसान झाले. त्यांचे सर्वेक्षण ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी या तीन्हीच्या मार्फत सही निशी करून अनुदान देण्याची मागणी अतिवृष्टीधारक नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)