अगरबत्तीमुळे रेखाच्या कुटुंबात दरवडला सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:27 PM2017-12-04T22:27:16+5:302017-12-04T22:27:50+5:30

अल्पशा शेतीच्या भरवशावर अवलंबून असलेल्या पाच सदस्यांचे कुटुंब गरिबीत जीवन जगत होते.

Due to the incense sticks in the family of the line, scent of taste | अगरबत्तीमुळे रेखाच्या कुटुंबात दरवडला सुगंध

अगरबत्तीमुळे रेखाच्या कुटुंबात दरवडला सुगंध

Next
ठळक मुद्देयश स्वयंसहायता महिला बचत गट : पतीलाही मिळाला रोजगार व मुलांच्या शिक्षणाला हातभार

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : अल्पशा शेतीच्या भरवशावर अवलंबून असलेल्या पाच सदस्यांचे कुटुंब गरिबीत जीवन जगत होते. अशात सालेकसा तालुक्यातील मुरूमटोला येथील त्या कुटुंबातील रेखा चमरू राऊत या महिलेने गावातील यश स्वयंसहायता बचत गटात प्रवेश केला. माविमंचे सहकार्य व सहयोगीनींचे मार्गदर्शन यामुळे कर्ज घेवून शेळीपालन व नंतर अगरबत्ती व्यवसाय सुरू केला. या अगरबत्ती व्यवसायातून रेखाच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती झाली.
रेखा राऊत यांच्या कुटुंबात त्या, दोन मुली, मुलगा, पती असे पाच सदस्य आहेत. सुरूवातीला त्यांनी बचत गटातून पाच हजार रूपयांचे कर्ज घेतले व एक शेळी विकत घेतली. आता शेळ्यांच्या संख्येत वाढ झाली. यात त्यांच्या पतीनेही त्यांना वेळोवेळी साथ दिली. या पहिल्या व्यवसायाने त्यांना बचत व कर्ज परतफेडीची माहिती मिळाली. माविमकडून फिरता निधी गटाला मिळाल्याने त्यांना मदत झाली.
माविमने वेळोवेळी गटाला भेटी देवून मार्गदर्शन दिले व शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यानंतर गटाला मार्च २०१५ मध्ये एक लाख रूपयांचा पहिला कर्ज मिळाला. त्यात सर्व महिलांनी ते वाटून घेतले. एप्रिल २०१७ मध्ये दुसरे कर्ज एक लाख ९० हजार रूपयांचे दिले. त्यापैकी एक लाख रूपये १० महिलांनी लहानमोठ्या कामासाठी उपयोगात आणले. तर रेखा यांनी ९० हजार रूपये घेतले. त्यात सीसी मरके व सीआरपी मंदा यांच्या सहकार्याने अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी ठाणा येथून मशीनही आणली.
त्यावेळी त्यांना गटाची परतफेड नऊ हजार २०० रूपये दरमहिना करावयाची होती. तसेच पाच हजार रूपये परतफेड द्यावे लागते. त्यासाठी आणि कच्च्या मालासाठी सहा हजार रूपयांची त्यांना अडचण निर्माण झाली होती. त्यांनी सीआरपी मंदा यांना बोलावून समस्या मांडली व २५ हजार रूपयांचे कर्ज देण्याची मागणी केली. सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था सालेकसाकडून त्यांना २५ हजार रूपये मिळवून देण्यात आले. त्यात त्यांनी सहा हजार रूपयांचा कच्चा माल बोलावून एका दिवसात ४० ते ५० किलो अगरबत्त्या तयार करुन व्यापाºयाला विकणे सुरू केले. या व्यवसायातून रेखा यांना आता २२ हजार रूपये महिन्याकाठी मिळत आहेत.
याच व्यवसायातून त्यांना नवीन एक रोजगारसुद्धा मिळाला. त्यात त्यांच्या पतीचे सहकार्य व मिळालेल्या फिरत्या निधीच्या वापरातून तेथेच २० हजार रूपयांचा किरणा सामान भरून दुकान सुरू केले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढला व पतीलाही रोजगार मिळाला.
१२ महिलांचे बचत गट
सालेकसा येथून तीन किमी अंतरावर मुरूमटोला हे छोटेसे गाव आहे. गावात यश स्वयंसहायता महिला बचत गट आहे. रेखा राऊत या आधी गटात नव्हत्या. बचतीचे महत्वही त्यांना समजत नव्हते. त्यानंतर सहा गोंड समाजातील व चार ओबीसी समाजाच्या महिला मिळून गट तयार करण्यात आला. गटाला मार्गदर्शन व फिरता निधी मिळाल्याने सुरूवातीला घाबरत तीन महिलांनी पाच-पाच हजार रूपये वाटप केले. त्यापैकी रेखा यांनी शेळीपालनापासून सुरूवात केली व अगरबत्ती व्यवसायापर्यंत मजल मारली.
मार्गदर्शन व माविमच्या सहकार्याने तीन व्यवसाय सुरू
रेखा राऊत यांनी सुरूवातीला पाच हजार रूपयांतून शेळी घेतली होती. आता शेळ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर ९० हजार रूपयांचे आयसीआयसीआय बँकेतून कर्ज घेतले व अगरबत्ती व्यवसाय सुरू केला. त्यानंतर जनरल स्टोर्स सुरू केला व त्यांच्या पतीलाही रोजगार मिळाला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारुन मुलांच्या शिक्षणालाही हातभार लागला.

Web Title: Due to the incense sticks in the family of the line, scent of taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.