धान न निसवल्याने शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:48 AM2018-11-28T00:48:01+5:302018-11-28T00:48:32+5:30

यशोदा हायब्रिट सीड प्रा.लिमिटेड हिंगणघाट या कंपनीच्या जयश्रीराम धानाची खरेदी करुन लागवड करणाऱ्यां एका शेतकऱ्यावर धान न निसविल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

Due to lack of food, the crisis on farmers | धान न निसवल्याने शेतकऱ्यांवर संकट

धान न निसवल्याने शेतकऱ्यांवर संकट

Next
ठळक मुद्देबियाणे कंपनीवर प्रश्नचिन्ह : नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यशोदा हायब्रिट सीड प्रा.लिमिटेड हिंगणघाट या कंपनीच्या जयश्रीराम धानाची खरेदी करुन लागवड करणाऱ्यां एका शेतकऱ्यावर धान न निसविल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
प्राप्त माहितीनुसार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील सुनील कृषी केंद्रातून यशोदा हायब्रिड सीड प्रा. लिमीटेड हिंगणघाटतर्फे तयार करण्यात आलेल्या जयश्रीराम धानाचे बियाणे खरेदी करुन नवेगावबांध येथील शेतकरी माधव डोंगरवार यांनी आपल्या शेतात लागवड केली. मात्र त्यांनी लागवड केलेले एक ते सव्वा एकरातील सदर कंपनीचे धान निसविलेच नसल्याने त्यांच्यावर राम राम म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुनील कृषी केंद्र व यशोदा हायब्रीड सीड कंपनी कडून नुकसान भरपाई देण्याची मागणी डोंगरवार यांनी केली आहे.
सदर कृषी केंद्रातून डोंगरवार यांनी १०-१० किलोच्या चार बॅग जय श्रीराम (गोल्ड) धानाची बियाणे ८ जून २०१८ ला खरेदी केले. त्यांनी त्यांच्या एक हेक्टर आर जमिनीवर लागवड केली. जयश्री राम धान निघण्याची मुदत १३० ते १३५ दिवसाची होती. धानाची रोवणी केल्यानंतर भरपूर मेहनत घेतली. मात्र धान निसविण्याच्या कालावधीत धान निसविलेच नाही. त्यामुळे डोंगरवार यांनी २२ आॅक्टोबरला अर्जुनी मोरगावचे खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सुनील कृषी केंद्रामार्फत यशोदा हायब्रिड सीड प्रा. लिमीटेड कंपनीला तक्रार केली.
मात्र या प्रकरणाकडे अधिकारी व कंपनी लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप डोंगरवार यांनी केला आहे. डोंगरवार यांनी गट क्र. ६६८ मधील एक हेक्टर आर(अडीच एकर) शेतात धानाची पेरणी करुन रोवणी केली. धान चांगल्याप्रकारे उगवले. मात्र वेळेवर धान निसविलेच नाही. मागील एक महिन्यापासून फक्त २० टक्के धान निसवला दिसतो व उर्वरीत धान पोटरीवर आहे. या २० टक्के निसवलेल्या धानाच्या फुलोºयावर धानाचे लोंबच नाही. त्यामुळे बियाणे कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप डोंगरवार यांनी केला आहे. तर धान न उगविल्याने त्यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
या प्रकरणाची तक्रार खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली मात्र अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. कंपनीवर कायदेशीर कारवाई करुन नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डोंगरवार यांनी दिला आहे.

Web Title: Due to lack of food, the crisis on farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी