कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुभाष बागेची आबाळ

By admin | Published: October 4, 2015 02:40 AM2015-10-04T02:40:28+5:302015-10-04T02:40:28+5:30

बाग आहे मात्र त्याला माळीच नाही म्हटल्यास तोंडात बोट घालण्याची वेळ येते.

Due to lack of staff, Subhash Bagge's family | कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुभाष बागेची आबाळ

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुभाष बागेची आबाळ

Next


गोंदिया : बाग आहे मात्र त्याला माळीच नाही म्हटल्यास तोंडात बोट घालण्याची वेळ येते. मात्र ही आर्श्चयजनक बाब शहरातील एकमेव सुभाष बागेशी संबंधित आहे. नगर परिषदेच्या या भव्य बागेसाठी माळीच नाही. शिवाय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बागेची देखरेख व कामकाज प्रभावित होत आहे. शहरातील एकमात्र बागेला सुसज्ज करण्यात येथील नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याचे यातून दिसून येते.
शहरात नगर परिषदेची आता एकमात्र सुभाष बाग उरली आहे. बागेच्या अन्य जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तर काही जागांचा अन्य उपयोगासाठी वापर केला जात आहे. अशात सकाळी आणि सायंकाळी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना फिरण्यासाठी फक्त सुभाष बाग उरली आहे. शहरातील प्रदूषणयुक्त वातावरणापासून मुक्त होऊन चार क्षण शुद्ध वातावरणात घालविण्यासाठी शहरवासीयांचा कल सुभाष बागेकडे असतो.
शहराच्या ह््दयस्थळी असलेली ही सुभाष बाग बाराही महिने नागरिकांच्या गर्दीने फुललेली असते. बागेतील शुद्ध वातावरणात चकरा मारण्यासाठी किंवा आपल्या बालगोपालांना बागेतील खेळण्यांवर खेळण्या-बागडवण्यासाठी शहरवासी मोठ्या उत्सुकतेने येथे येतात. मात्र बागेत पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्था दिसून येत नाही.
आजघडीला बागेत उगवलेले गवत गुडघ्यापेक्षा जास्त वाढले असून जंगली रोपटेही जिकडेतिकडे वाढलेले दिसते. बागीचा प्रशासनाकडून त्यांची कटाई करण्याचे काम सुरू आहे.
मात्र बागेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हे काम पाहिजे त्या गतीने होताना दिसून येत नाही. परिणामी जंगली गवत बागेत झपाट्याने वाढत चालले आहे. याशिवाय बागेत असलेल्या खेळण्यांतील एक-दोन खेळणी तुटलेली असल्याने चिमुकल्यांना त्यावर खेळता येत नाही. त्यांचा हिरमोड होते.
विशेष म्हणजे गेल्यावर्षीच या बागेत काही खेळण्यांची दुरूस्ती झाली होती. मात्र वर्षभरात ही खेळणी पुन्हा खराब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
बागेचे सौंदर्य हरपतेय
बागेत माळीच नसल्याने वाढलेल्या झाडांची पद्धतशीरपणे कापणी करणे, फुलझाडांची देखरेख, जंगली गवत व झाडांच्या उगवण्यावर उपाययोजना, खत व कीटकनाशक फवारणी करणे आदि कामे बागेत होत नाहीत. परिणामी बागेचे सौंदर्य हरपले आहे. एवढी मोठी बाग असूनही माळी नसणे ही बाब नगर परिषदेसाठी नामुष्कीची ठरत आहे.
बागेत येणाऱ्यांना मात्र याचा त्रास होतो. शहरात एकमेव बाग असताना त्याची देखभाल करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र यातून दिसून येते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to lack of staff, Subhash Bagge's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.