सिलिंडरच्या मर्यादित कोट्यामुळे वृक्षतोड जोमात
By admin | Published: November 23, 2015 01:41 AM2015-11-23T01:41:09+5:302015-11-23T01:41:09+5:30
गॅसच्या दरवाढीने हतबल झालेल्या गृहिणींना पुन्हा इंधनाकरिीाा लाकडाचा उपयोग करणे भाग पडत आहे. त्यामुळे वृक्षतोड जोमात सुरू आली आहे.
खजरी : गॅसच्या दरवाढीने हतबल झालेल्या गृहिणींना पुन्हा इंधनाकरिीाा लाकडाचा उपयोग करणे भाग पडत आहे. त्यामुळे वृक्षतोड जोमात सुरू आली आहे.
गॅस सिलिन्डरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य गॅसधारकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. परिणामी झुडपी जंगलालगत वास्तव्य करणारे नागरीक जंगलात जाऊन किंवा शेतशिवारात जावून झाडाची कत्तल करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येते.
शहरालगत तसेच ग्रामीण भागात वृक्षतोडीचा प्रकार सतत वाढतच चालला आहे. या भागात ज्याला वाटेल तो त्या परीसरात असलेल्या वृक्षाची तोड करीत आहेत. यात मुख्यता म्हणजे लहान-लहान वृक्षाची कत्तल मोठ्या वृक्षा पेक्षा जास्त होत असल्याचा प्रकार सध्या या भागात दिसून येत आहे. राज्य शासनाचा वन खात्यानी अवैध वृक्षतोडीवर वन कायद्याने बंदी घालण्यात आली असली तरी तो कायदा फक्त कागदावरच असल्योच दिसून येत आहे. वन विभागाने कायदाचा पालन करणे अती आवश्यक असून सुध्दा कायद्याचे पालन होत नाही. असे जनमानसात चर्चेला उथान आलेला आहे. या भागात वृक्षाची तोड करून लहान-मोठ्या वाहनांनी या लाकडाचा ने-आण होत आहे. मात्र विभागाचे अधिकारी केवळ आपल्या लाभाच्या बाबीकडे अधिक लक्ष देण्यात व्यस्त असल्याचे याकडे लख देण्यास त्याना वेळ नसल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
सर्व ग्रामीण भागात इंधनाची व्यवस्था करण्याचा नादात जंगलातील तसेच शेत शिवारातील असलेल्या मौल्यवान वन औषधी वृक्षाचीही कत्तल होत आहे तर एकीकडे जंगलातील शेतातील वन औषधी वृक्षाची जोपासना, बचावाकरिता शासनाच्यावतीने अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. दुसरीकडे या मौल्यवान वृक्षाचा बचावाकरिता कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. वृक्षाचा बचाव करता-करता प्रत्येक गावोगावात गावकऱ्याचा मध्यस्थीने वनरक्षक समीत्या गठीत केल्या होत्या. वनाचे रक्षण करतात की वनाचे भक्षण हे वनविभागातील वन अधिकाऱ्यानाच ठाऊक आहे.
ग्रामीण भागात पूर्वीच वृक्षाची संख्या फार कमी आहे यात काही प्रमाणात औषधीच वनस्पती ही आहेत. याची जाणीव वनविभागाला पूर्वीच आहे की नाही याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. या ग्रामीण भागात मर्यादित प्रमाणात हिरडा, बेहडा, अर्जुन खैर, बेल, आॅवला, नीलगिरी, जांभुळ, चिंच असा अनेक बहुमुल्य वृक्षाची तोड इंधनाकरिता करण्यास जोरात सुरू आहे. (वार्ताहर)