‘लोकमत’मुळे दिल्ली बघता आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:22 PM2019-06-28T21:22:29+5:302019-06-28T21:22:43+5:30

या वयात दिल्ली बघायला मिळणार असा विचारही केला नव्हता. मात्र ‘लोकमत’च्या संस्काराचे मोती या स्पर्धेने ही ंसंधी मिळवून दिली. अन्यथा हवाई सफर करता येणार अशी कल्पनाही कधी केली नव्हती.

Due to 'Lokmat', I was able to see Delhi | ‘लोकमत’मुळे दिल्ली बघता आली

‘लोकमत’मुळे दिल्ली बघता आली

Next
ठळक मुद्देनिखील मोहारेची हवाई सफर : ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : या वयात दिल्ली बघायला मिळणार असा विचारही केला नव्हता. मात्र ‘लोकमत’च्या संस्काराचे मोती या स्पर्धेने ही ंसंधी मिळवून दिली. अन्यथा हवाई सफर करता येणार अशी कल्पनाही कधी केली नव्हती. या हवाई सफरमधून दिल्लीतील इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, इंदिरा गांधी स्मृती भवन, वार मेमोरीअल आणि रेल्वे संग्रहालय बघण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे नागपूर ते दिल्ली हवाई सफर करुन परत आलेला ग्राम लोधीटोला येथील निखील मोहारे हा विद्यार्थी सांगत होता.
लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेंतर्गत येथील शहीद मिश्रा विद्यालयातील इयत्ता सातवीतील विद्यार्थी निखील तेजराम मोहारे याची नागपूर-दिल्ली हवाई सफरसाठी निवड झाली. हा प्रवास करुन तो आपल्या गावी पोहचला.
यानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य सतीश मंत्री यांच्या हस्ते पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे यांच्या अध्यक्षतेत पर्यवेक्षक व्ही.एस. तागडे, तालुका क्रीडा समिती अध्यक्ष राजेश असाटी, लोकमत संस्काराचे मोती विद्यालय प्रभारी लोकेश चौरावार, सुनील शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याने आपल्या हवाई सफरचे वर्णन कथन केले.
निखील सांगत होता, स्पर्धेच्या कुपणकरिता माझ्या बाबांनी मला पेपर सुरु करुन देवून मदत केली. विशेष म्हणजे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी डी.आर. गिरीपुंजे यांनी फोल्डर्स वितरण करताना जिल्ह्यातून एका नशिबवान विद्यार्थ्याला दिल्ली हवाई सफर मिळणार असल्याचे सांगीतले होते. त्याचवेळी ही सफर मला मला मिळावी अशी इच्छा निर्माण झाली होती. नशिबाने माझीच निवड झाली व दिल्लीला स्पर्श करायची संधी मिळाली.
प्राचार्य मंत्री यांनी, ‘लोकमत’ संस्काराचे मोती हा उपक्रम प्रेरणादाई व ज्ञान वाढविणारा आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यात आत्मविश्वास वाढत असून त्याची आज गरज आहे. तसेच स्पर्धा परीक्षा व सामान्य ज्ञान यासाठी हा उपक्रम कसा फायदेशीर आहे हे उदाहरण देवून पटवून दिले. संचालन लोकेश चौरावार यांनी केले. आभार सुनील शेंडे यांनी मानले.

माझ्यासारख्या गरीब मोटरसायकल दुरुस्ती करणाऱ्याच्या मुलाला दिल्ली हवाई सफर ‘लोकमत’मुळे मिळाली. याबद्दल ‘लोकमत’ वृत्तपत्रासह, शिक्षक व प्राचार्य यांचा मी खूप आभारी आहे. दिल्लीतील अनुभव माझ्या मुलाला अविस्मरणीय असून तो अनुभव त्याच्या भावी जीवनात निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
-तेजराम मोहारे

Web Title: Due to 'Lokmat', I was able to see Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.