पार्किंग व्यवस्था होत नसल्याने वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 09:59 PM2019-02-11T21:59:43+5:302019-02-11T21:59:51+5:30

कचारगड यात्रेदरम्यान रेल्वे आणि सडक मार्गाने बस किंवा इतर साधनांनी भाविक मोठ्या संख्येने येतात. दिवसेंदिवस आता स्वत:च्या चारचाकी-दुचाकी वाहनांनी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून कचारगड यात्रेदरम्यान हजारो चारचाकी वाहने एका वेळेले आलेली दिसतात व त्यांच्या पार्कीगची मोठी समस्या निर्माण झालेली असते. अशात समितीच्या सहकार्याने शासनस्तरावर वाहन खडे बनवून दिले तर वाहनांची व्यवस्थीत पार्कीग होऊ शकते.

Due to parking arrangements, traffic congestion | पार्किंग व्यवस्था होत नसल्याने वाहतुकीची कोंडी

पार्किंग व्यवस्था होत नसल्याने वाहतुकीची कोंडी

googlenewsNext
ठळक मुद्देहजारो वाहने राहतात रस्त्यावर उभी : वाहनांच्या सुरक्षेची समस्या

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कचारगड यात्रेदरम्यान रेल्वे आणि सडक मार्गाने बस किंवा इतर साधनांनी भाविक मोठ्या संख्येने येतात. दिवसेंदिवस आता स्वत:च्या चारचाकी-दुचाकी वाहनांनी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून कचारगड यात्रेदरम्यान हजारो चारचाकी वाहने एका वेळेले आलेली दिसतात व त्यांच्या पार्कीगची मोठी समस्या निर्माण झालेली असते. अशात समितीच्या सहकार्याने शासनस्तरावर वाहन खडे बनवून दिले तर वाहनांची व्यवस्थीत पार्कीग होऊ शकते.
कचारगड यात्रेदरम्यान सतत ५ दिवस लाखो भाविक व पर्यटक आपल्या स्वत:च्या वाहनांनी येतात. परंतु त्यांना आपली वाहने सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने धनेगाव ते दरेकसा जमाकुडोपर्यंत बेवारस अवस्थेत आपल्या वाहनांना उभे करुन कचारगड गुफेसाठी निघावे लागते. किंवा धनेगाव नजीकच्या शेतात आपली वाहने ठेवावी लागतात. अशात बाहेरुन आलेल्या भाविकांची वाहने भगवान भरोसे पडून राहतात. यात्रेदरम्यान काही लोक पार्कींगच्या नावावर वाहन मालकांकडून रक्कम वसूल करतात आणि त्यामध्ये संबंधीत शेतमालक सुद्धा आपला वाटा मागतो. अशात भाविकांकडून गरजेपेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याची तक्रार सुद्धा येते.
अशा परिस्थितीत समितीच्या निगरानीमध्ये योग्य शुल्क घेवून पार्कीग व्यवस्था केली पाहिजे तसेच रस्त्यावर आपली वाहने उभी करणाºयाला पार्कीग ठिकाणी नेण्यास सांगीतले पाहिजे.
धनेगाव हा गोंदिया, आमगाव, सालेकसा, दरेकसा राज्य मार्गावर असून सरळ डोंगरगड पर्यंत जातो. त्यामुळे या मार्गावरुन नेहमी विविध वाहने येत-जात असतात. परंतु यात्रेदरम्यान धनेगावजवळ भर रस्त्यावर हजारो वाहने उभी असतात व त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.


ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्ताची गरज
कचारगड धनेगाव परिसर अतिदुर्गम डोंगराळ व संवेदनशील तसेच नक्षलग्रस्त भागात मोडत असून या परिसरात सुरक्षेचा एक मोठा प्रश्न असतो. परंतु त्याचबरोबर कचारगड गुफेकडे जाताना भाविकांना डोंगर चढून वर जावे लागते. भाविकांमध्ये महिला, पुरुष लहानमोठे अबाल वृद्ध सर्वच भक्तांचा समावेश असतो. पहाड चढताना इजा होण्याची दाट शक्यता असते. अशात सुरक्षा जवान प्रत्येक ठिकाणी तैनात असले तर गुफेकडे येण- जाने सोपे व सुरक्षीत ठरु शकते. याबरोबर गुफा परिसरात प्राथमिक उपचाराची व्यवस्था असणे सुद्धा आवश्यक आहे. आतापर्यंत यात्रेदरम्यान गुफा परिसरात कोणत्याही प्रकारच्या उपचाराची सोय ठेवण्यात आली नाही.

सिमेंट नाल्यांची गरज
धनेगाव परिसरात रस्त्याच्या बाजूला पाणी किंवा सांडपाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट नाल्या नसल्याने यात्रेदरम्यान वाहणारे सांडपाणी पुढे वाहून जात नाही व घाणीचे साम्राज्य निर्माण होते. त्याचबरोबर यात्रेदरम्यान किंवा यात्रेपूर्वी कधी अवकाळी पाऊस आला तर धनेगाव परिसरात सर्वत्र चिखल आणि घाण पसरते. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होते. दुकानदारांना रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने लावणे कठीण जाते. शासनस्तरावर सांडपाण्याचा नाल्या बनवून देणे आवश्यक आहे.

यात्रेदरम्यान धनेगाव परिसरात २-३ ठिकाणी औषधोपचार केंद्र लावण्यात येतील. तसेच परिसरात मोबाईल उपचार पथक सुद्धा सेवेत तत्पर राहील.
-डॉ. गगन गुप्ता, तालुका आरोग्य अधिकारी
कचारगड यात्रेसाठी ७०० जवानांची अतिरीक्त सोय करण्यात येणार आहे. एकावेळी १५० ते २०० जवान सेवेत तत्पर राहतील. गरज पडल्यास त्यांची संख्या वाढविली जाईल. यात महिला पोलीस सुद्धा आवश्यक प्रमाणात तैनात करण्यात येतील.
-राजकुमार डुणगे, पोलीस निरीक्षक, सालेकसा

Web Title: Due to parking arrangements, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.