डवकीच्या ईव्हीएम मशीनमध्ये घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:31 AM2017-10-26T00:31:40+5:302017-10-26T00:31:52+5:30
देवरी तालुक्याच्या डवकी ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्याच्या डवकी ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. यासंदर्भात देवरीचे तालुका निवडणूक निर्णय अधिकारी दोषी असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
१६ आॅक्टोबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी नागरिक मतदान केंद्रावर गेले असता मतदान सुरू होण्यापूर्वीच ईव्हीएम मशीनला सील लावले नव्हते. ईव्हीएम मशीनचे सील पूर्वीच तोडण्यात आले होते. वेळीच यासंदर्भात तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांना सांगितले असता निवडणूक अधिकाºयांनी यावर दुपारी ३ वाजता निर्णय घेऊ असे सांगून मतदारांना शांत बसविले. नंतर काही नागरिकांनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी दुपारी ३.३० वाजता दरम्यान तहसील कार्यालयात भेटण्यास सांगितले. आक्षेप नोंदविण्याकरिता गेलेल्या लोकांना त्यांनी धमक्या दिल्याचा आरोप आहे.
ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून आपल्या मर्जीतील उमेदवाराला विजयी करण्यात तालुका निवडणूक निर्णय अधिकाºयांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे डवकी येथील निवडणूक पुन्हा बायलट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. यासंदर्भात डवकी येथील ६३७ मतदारांच्या स्वाक्षरीची तक्रार जिल्हाधिकाºयांना केली आहे. डवकी येथे एकूण ११९० मतदार आहेत. १०३० लोकांनी मतदान केले. या मतदान करणाºयांपैकी ६३७ लोकांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याची तक्रार केली आहे. येत्या सात दिवसात पुन्हा निवडणूक न घेतल्यास ग्रामपंचायतीचे कामकाज होऊ देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे.