वृक्षारोपणासाठी तीन हजार खड्डेच खोदून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:59 PM2019-07-01T21:59:00+5:302019-07-01T21:59:21+5:30
३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत यंदा नगर परिषदेला पाच हजार ६०० वृक्ष लागवडीचे टार्गेट आहे. त्यानुसार नगर परिषदेने नियोजन सुर केले असून शहरातील विविध भागांत आतापर्यंत सुमारे तीन हजार खड्डे खोदण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत यंदा नगर परिषदेला पाच हजार ६०० वृक्ष लागवडीचे टार्गेट आहे. त्यानुसार नगर परिषदेने नियोजन सुर केले असून शहरातील विविध भागांत आतापर्यंत सुमारे तीन हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. १ जुलैपासून वृक्ष लागवड अभियानाला सुरूवात झाली असून नगर परिषद यंदा तरी टार्गेट पूर्ण करते की नाही हे बघायचे आहे.
घटत चाललेल्या वृक्षांच्या संख्येमुळे पर्यावरणाचा ºहास होत असून बदलते वातावरण हे त्याचे सूचक आहेत. अशात पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज झाली आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड हाच त्यावर एकमात्र उपाय आहे. वृक्ष लागवडीचे गांभीर्य लक्षात घेत शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबविली जात असून यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाने नगर परिषदेला ४ हजार ७०० वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले आहे. मात्र यंदा नगर परिषद टार्गेट पेक्षा जास्त वृक्ष लागवड करणार असल्याचे ठरवून ५ हजार ६०० वृक्ष लागवडीचे नियोजन करीत आहे.
त्यानुसार, नगर परिषद वृक्ष लागवडीच्या कामाला लागली आहे. यासाठी संबंधित अभियंता पूर्ण अभियानासाठी नियोजन करीत असून शहरातील विविध भागांत अद्याप सुमारे तीन हजार खड्डे खोदण्यात आल्याची माहिती आहे.१ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ झाला असून नगर परिषद आताही खड्डेच खोदत असल्यान हे अभियान थंडावणार तर नाही शंका येत आहे.
असे केले नियोजन
३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत नगर परिषदेने स्टेट बँक कॉलनी ते साई माऊली कॉलनीपर्यंत ५०० रोपटी, छोटा पाल चौक ते बालाघाट रेल्वे क्रॉसींग पर्यंत ३००, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर २००, शहरातील कुंभारेनगर परिसरातील नगर परिषद डॉ.आंबेडकर स्कलमध्ये ३००, सिव्हील लाईन्स नूतन विद्यालयात २००, शासकीय टेक्निकल स्कूलमध्ये २००, गोविंदपूर परिसरातील नगर परिषद बालक मंदिरात ३०, गोविंदपूर नगर परिषद प्राथमिक शाळेत ३०, नगर परिषद कार्यालय परिसरात १००, चौरागडे मेडीकल ते अंगून बगिचा परिसरात ५००, सिव्हील लाईन्स साई मंदिर परिसरात ५००, सिंधी स्कूल ते बाजपेई चौकपर्यंत ५०० तर हड्डीटोली क्रॉसींग ते मरारटोली रस्तापर्यंत एक हजार वृक्ष लागवडचे नियोजन केले आहे.
खड्डे खोदण्याचे काम त्याच एजंसीला
नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एका एजंसीने कर्मचाऱ्यांचे मागील कित्येक महिन्यांचे पगार दिले नसल्याने कर्मचारी चांगलेच संतापले आहेत.यावर सर्वसाधारण सभेत या एजंसीचे मनुष्यबळ पुरवठ्याचे तीन वर्षांचे कंत्राट रद्द करून एक वर्ष करण्यात आले आहे. सहा-सात महिन्यांपासून कर्मचाºयांना पगार न देणे, शिविगाळ करणे आदी प्रकार कंत्राटदार करीत असूनही त्याच्यावर नगर परिषदेने काहीच कारवाई न केल्यान सर्वांनाच आश्चर्य होत आहे. असे असतानाच वृक्ष लागवडसाठी खड्डे खोदण्याचे काम या वादग्रस्त एजंसीलाच देण्यात आले असल्याची माहिती आहे. यामुळे या एजंसीवर एवढी मेहरबानी का केली जात असल्याची चर्चा नगर परिषद वर्तुळात सुरू आहे.