विमुक्त भटक्या जमातीचा धडक मोर्चा

By admin | Published: February 24, 2016 01:43 AM2016-02-24T01:43:22+5:302016-02-24T01:43:22+5:30

भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील ....

Dukta Front of Nimukta Jatakya tribe | विमुक्त भटक्या जमातीचा धडक मोर्चा

विमुक्त भटक्या जमातीचा धडक मोर्चा

Next

संघर्ष वाहिनी : सातही तहसीलवर धडक
गोंदिया : भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील ८ व भंडारा जिल्ह्यातील ७ अशा एकूण १५ तहसील कार्यालयांवर एकाच दिवशी दि.२९ ला विमुक्त भटक्या जमातीचा मोर्चा धडकणार आहे.
संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूर या सामाजिक संस्थेच्या आवाहनानुसार महत्वपूर्ण मागण्यांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील या मोर्च्यानंतर महाराष्ट्रातील इतर दोन-दोन जिल्ह्यात क्रमाक्रमाने सदर मोर्चे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी धडकणार असल्याची माहिती संघर्ष वाहिणीचे प्रमुख दिनानाथ वाघमारे आणि सहकाऱ्यांनी दिली आहे.
विमुक्त भटक्या जमातींना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका यामध्ये ११ टक्के स्वतंत्र आरक्षण द्या, क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करा, राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विशेष आर्थिक तरतूद करा, अनुसूचित जाती-जमातीच्या धर्तीवर व्हीजे-एनटीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वसतीगृह तयार करावे, भूमिहिनांना पडीत जमिनी, बेघरांसाठी घरकूल योजना, बेरोजगारांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन अल्प दराने कर्ज योजना लागू करा, जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रसूती पश्चात मिळणारा निधी विमुक्त भटक्या जमातीच्या गरोदर महिलांनासुध्दा मिळावा, मच्छिमारांना २०० दिवस काम व विकास योजना लागू करा, अशा मागण्या असल्याचे संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते परेश दुरूगवार, अनिल मेश्राम, दिलीप कोसरे, जयचंद नगरे, धनपाल मेश्राम, रमेश मेश्राम, विनोद मेश्राम आदींनी कळविले.

Web Title: Dukta Front of Nimukta Jatakya tribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.