नाथजोगी समाजाचे सेवक दुलिचंद बुद्ध झाले सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:27 AM2021-04-18T04:27:55+5:302021-04-18T04:27:55+5:30
यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगर परिषद बांधकाम सभापती राजेंद्र कुथे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, सेवानिवृत्ती सहायक आयुक्त अनिल ...
यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगर परिषद बांधकाम सभापती राजेंद्र कुथे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, सेवानिवृत्ती सहायक आयुक्त अनिल देशमुख, अधिकारी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डी. यू. रहांगडाले, अश्विन ठक्कर, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता संजय कटरे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. रोशन कानतोडे, डॉ. अजय बिरनवार, डॉ. निरज गुप्ता, लीलाधर पाथोडे, विठ्ठल भरणे, टी. एस. झझांड, नवीन जैन, मनोज पटनायक, विजय बाहेकर, गजेद्र फुंडे, सुनील भोयर, आदी उपस्थित होते. दुलिचंद बुद्धे यांचा अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांशी संबंध आला. त्यातच मांगगारोडी समाज, नाथजोगी समाज, होली समाज यांच्या मूलभूत समस्या शासन दरबारापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुलिचंद बुद्धे व त्यांची पत्नी प्रभा बुद्धे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सामाजिक कार्य नोकरी सांभाळून करणे हे काम जिकिरीचेच होते; परंतु मनाशी केलेला निश्चय व सर्वांचे मिळालेले सहकार्य यामुळेच शक्य होऊ शकले. यात ‘लोकमत’चा सुद्धा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले.