शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त डुलीचंद पटले यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:57+5:302021-04-04T04:29:57+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य स्तरावर कृषी क्षेत्रात पुरस्कार मिळणे हे त्या जिल्ह्याचा तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य स्तरावर कृषी क्षेत्रात पुरस्कार मिळणे हे त्या जिल्ह्याचा तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी के. एन. मोहाडीकर, कृषी अधिकारी वाय. बी. बावनकर, मंडळ कृषी अधिकारी पी. पी. खंडाईत, कृषी पर्यवेक्षक जी. आर. फटिंग, कृषी सेवक जितेंद्र बावनकुळे, सरपंच मदन पटले व शेतकरी वर्ग उपस्थित होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील व के. एन. मोहाडीकर यांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी डुलीचंद पटले व मदन पटले यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डुलीचंद पटले यांनी कृषी विभागाकडून मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. कृषी सहायक खंडाईत व जितेंद्र बावनकुळे यांनी आत्मा अंतर्गत राबविलेल्या सेंद्रिय शेती, सेंद्रिय भात पिकात मत्स्यपालन, बोडीत शिंगाडा, शेततळ्यात मत्स्यपालन, आदी बाबींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन कृषी पर्यवेक्षक जी. आर. फटिंग यांनी केले. आभार कृषी सेवक जितेंद्र बावनकुळे यांनी मानले.
.....