व्यापाऱ्यांना दिला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:22 PM2018-10-01T21:22:29+5:302018-10-01T21:23:43+5:30
प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने सोमवारी (दि.१) अचानक मोहीम छेडून शहरातील सहा व्यापाऱ्यांना दणका दिला. पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे दंड ठोठावला असून त्यांच्याकडील प्लास्टीक पिशव्या, थर्माकोल प्लेट व अन्य असे एकूण ६ किलो वजनाचे साहित्य जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने सोमवारी (दि.१) अचानक मोहीम छेडून शहरातील सहा व्यापाऱ्यांना दणका दिला. पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे दंड ठोठावला असून त्यांच्याकडील प्लास्टीक पिशव्या, थर्माकोल प्लेट व अन्य असे एकूण ६ किलो वजनाचे साहित्य जप्त केले.
प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतरही शहरात प्लास्टीक पिशव्या व थर्माकोल साहित्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेत, नगर परिषदेच्या पथकाने सोमवारी (दि.१) अचानकच शहारात मोहिम छेडली.
या मोहिमेत पथकाने शहरातील अग्रवाल प्लास्टीक, साई भगत सेल्स, इंडिया बुट हाऊस, संतुलाल अग्रवाल, व्यंकटेश्वरा डिस्पोजल व वैशाली राज पुरोहित या व्यापाऱ्यांकडे धाड घालून पाहणी केली. यावेळी या व्यापाऱ्यांकडे प्लास्टीक पिशव्या व थर्माकोल साहित्य मिळून आल्याने पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये दंड ठोठावला. पथकाने ३० हजार रूपयांचा दंड ठोठावत व्यापाऱ्यांकडील प्लास्टीक पिशव्या व थर्माकोल साहित्य असे ६ किलो वजनाचे साहित्य जप्त केले.
पथकात नगर परिषदेचे अभियंता उमेश शेंडे, सुमेध खापर्डे, देवेंद्र वाघाये, लिपीक प्रवीण गडे, शिव हुकरे, आरोग्य निरीक्षक मनिष बैरिसाल, मुक ेश शेंद्रे, प्रफुल पानतवने, सुमित शेंद्रे, रोहीदास भिवगडे यांचा समावेश होता.