पोलिसांमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:03 AM2017-10-22T00:03:33+5:302017-10-22T00:03:43+5:30

गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाºयांनी चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया लसनपेठटोला गावाला भेट देऊन .....

Duplicate the happiness of the Diwali Police | पोलिसांमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित

पोलिसांमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित

Next
ठळक मुद्देगावातील समस्या जाणल्या : लसनपेठटोलावासीयांसोबत साजरी केली दिवाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाºयांनी चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया लसनपेठटोला गावाला भेट देऊन येथील नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. त्यामुळे लसनपेठटोलावासीयांचा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
शहरवासीयांसाठी दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी दुर्गम भागातील नागरिकांकडे पैशाची कमतरता राहत असल्याने दिवाळीचा सण साजरा करण्याचा उत्साह राहत नाही. यावर्षी झालेल्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. दुर्गम भागातील नागरिकांना धीर देण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, घोटचे पोलीस उपनिरीक्षक सुनील जायभाये, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी शुक्रवारी लसनपेठटोला गाव गाठले. तेथील गावकºयांना मिठाई व फराळ देऊन आनंद द्विगुणीत केला. लहान मुलांना कपडे व फटाक्यांचे वाटप केले. त्यांच्या सोबत फटाखे फोडून आनंद लुटला. लसनपेठटोला हे गाव घोट पोलीस मदत केंद्रापासून १० किमी अंतरावर आहे. या गावात मूलभूत सोयीसुविधांचाही अभाव आहे. गावाला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. ३५ घरे असून १५० च्या जवळपास लोकसंख्या आहे. या गावाला पावसाळ्यात जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नाही. सहा किमी अंतरावर असलेल्या येडानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे लागते. यावेळी पोलीस अधिकाºयांनी गावकºयांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन गावकºयांना दिले.

Web Title: Duplicate the happiness of the Diwali Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.