संकट काळात पुण्याची संस्था आली जिल्ह्याच्या मदतीला धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:03+5:302021-05-13T04:30:03+5:30
संकट काळात जिल्हावासीयांच्या मदतीला धावून येणाऱ्या पुणे येथील त्या संस्थेचे नाव मराठा चेंबर्स ऑफ कामर्स अँड ॲग्रिकल्चर असे आहे. ...
संकट काळात जिल्हावासीयांच्या मदतीला धावून येणाऱ्या पुणे येथील त्या संस्थेचे नाव मराठा चेंबर्स ऑफ कामर्स अँड ॲग्रिकल्चर असे आहे. या संस्थेने जिल्ह्यातील कोविड परिस्थिती आणि ऑक्सिजनची होणारी समस्या लक्षात घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्याशी संपर्क साधून पाच दिवसांपूर्वी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि पाच मिनी व्हेंटिलेटर्स मशीन देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सोमवारी (दि. १०) हे सर्व साहित्य जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहे. हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करून ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे, तसेच पाच मिनी व्हेंटिलेटर्समुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेलाही बळ मिळाले आहे. कोरोनाच्या संकट काळात गोंदिया जिल्हावासीयांच्या मदतीला मराठा चेंबर्स ऑफ कामर्स अँड ॲग्रिकल्चर ही संस्था धावून आली. मदत केल्याबद्दल जिल्हा आरोग्य विभागाने या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.