आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार, हेच कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:00 AM2017-11-23T00:00:14+5:302017-11-23T00:00:46+5:30
गोंदिया-भंडारा जिल्ह्याची ओळख ‘धानाचे कोठार’ म्हणून आहे. परंतु या भागात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या ही बाब निश्चित चिंतेचा विषय आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याची ओळख ‘धानाचे कोठार’ म्हणून आहे. परंतु या भागात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या ही बाब निश्चित चिंतेचा विषय आहे. येथील शेतकरी आत्महत्याकडे वळूच नये, म्हणून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी कुशल उद्योजक बनण्याचा पॅटर्न राबविण्यात येईल. यापुढे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे. अशी ग्वाही आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिली.
१९ नोव्हेंबर रोजी गोरेगाव तालुक्यातील सोनी गावातील कल्पना पुरुषोत्तम टेंभरे या विधवा शेतकरी महिलेच्या कुटुंबाला भेट दिली. त्यांना मिळणाºया विविध सरकारी योजनांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. त्यांच्यासोबत शैलेंद्रसिंह राणा व गावातील मान्यवरांची उपस्थिती होते. फुके, म्हणाले की लवकरच रोजगाराची साधने पुरविण्यात येईल. याशिवाय कुटुंबातील आजारपण, त्यांच्यावरील उपचाराची सोय केली जाईल.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक शेतकºयांना रोजगाराचा विकासाचा पॅटर्न निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी आशा फुके यांनी व्यक्त केली. टेंभरे कुटुंबाने काही एकर जमीन येथील उपकेंद्राला दान स्वरुपात दिली होती. त्या उपकेंद्राला स्व. टेंभरे उपकेंद्र असे नाव देण्यात यावे व मुलाला येथे नोकरी देण्यात यावी. अश्ी मागणी शेतकरी विधवा पत्नी कल्पना पुरुषोत्तम टेंभरे यांनी केली. यावरही फुके यांनी योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.