गतिमंद बुध्दघोष काचेवाहीच्या सुधारगृहात

By admin | Published: July 8, 2015 01:42 AM2015-07-08T01:42:38+5:302015-07-08T01:42:38+5:30

पोटात अन्न नसल्यामुळे ललिता शिवकुमार रंगारी (३६) या दलित महिलेचा गेल्या २६ जून रोजी मृत्यू झाला.

Dynamic Buddha Ghosh Kachevahi Reforms House | गतिमंद बुध्दघोष काचेवाहीच्या सुधारगृहात

गतिमंद बुध्दघोष काचेवाहीच्या सुधारगृहात

Next

गोंदिया : पोटात अन्न नसल्यामुळे ललिता शिवकुमार रंगारी (३६) या दलित महिलेचा गेल्या २६ जून रोजी मृत्यू झाला. तिच्या गतिमंद असलेल्या बुध्दघोष शिवकुमार गणवीर (१८) या मुलावर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्यानंतर गोंदिया येथील बालकल्याण समितीने बुध्दघोषच्या पुनर्वसनासाठी त्याला रामटेक तालुक्यातील काचेवाही येथील सुधारगृहात सोमवारी पाठविण्यात आले.
मृतक ललिताच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी स्वीकारली. लहान मुलगा मामाकडे असला तरी गतिमंद बुद्धघोषला सांभाळणारे कोणी नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या अनुदानातून चालणाऱ्या काचेवाही येथील बाल सुधारगृहात त्याला हलविण्यात आले.
त्याच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी विशेष समाजकल्याण उपायुक्तांची आहे. मात्र त्यांना बुद्धघोषच्या भवितव्याबद्दल विचारले असता त्यांनी त्याबाबत काहीही माहित नसल्याचे सांगितले.
राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारले असतानाही त्यांच्या जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाची ही उदासीनता आश्चर्यकारक ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dynamic Buddha Ghosh Kachevahi Reforms House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.