‘ई-श्रम’ नोंदणी व कार्ड वाटप उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:59+5:302021-09-27T04:30:59+5:30
सडक-अर्जुनी : भारतीय जनता पक्षाच्या सेवा व समर्पण अभियानाअंतर्गत ग्राम कोसमतोंडी येथे नवभारत मेळाव्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या ...
सडक-अर्जुनी : भारतीय जनता पक्षाच्या सेवा व समर्पण अभियानाअंतर्गत ग्राम कोसमतोंडी येथे नवभारत मेळाव्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ई-श्रम या जनकल्याण योजनेंतर्गत नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर काशीवार, जिल्हा संयोजक गौरेश बावनकर, जगदीश काशिवार, महामंत्री शिशिर येळे, गजानन काशिवार, किशोर मडकाम, कुंदा मडकाम, शकुंतला काशीवार, विजय बावनकर, महेंद्र टेंभरे, संजय काशीवार, अशोक रामटेके, राजकुमार शामकुंवर, विकास कावडे उपस्थित होते. समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मजूर वर्गाच्या व अंत्योदय घटकाच्या उत्थानासाठी भारत सरकारने राबविलेल्या उपक्रमाअंतर्गत ई-श्रम ही योजना संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहायता, लाभार्थ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत, मातृत्व लाभ, कोणत्याही कामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी सहायता, घर बांधण्यासाठी आर्थिक मदत, वीज बिल सबसिडी, उपचारासाठी चिकित्सा रक्कम असे अनेक फायदे मजूर मार्गाला होणार आहेत. जिल्हा संयोजक गौरेश बावनकर यांनी राबविलेल्या या उपक्रमासाठी विद्या बावनकर, शिल्पा लांजेवार, प्रतिभा काशीवार, आरती बावणे, संतोषी सातभावे, रूपाली कावळे, लता कापगते यांनी सहकार्य केले.