प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:32 AM2021-09-22T04:32:30+5:302021-09-22T04:32:30+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंमलबजावणीबाबत सोमवारी (दि.२०) आढावा घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ...

Each department should discharge its responsibilities properly | प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी

प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी

Next

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंमलबजावणीबाबत सोमवारी (दि.२०) आढावा घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एल.के. पुराम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रोहिणी सागरे, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद, पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) रेखा बघेले उपस्थित होते.

पुढे बोलताना खवले यांनी, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना प्रत्येक विभागाला जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार इंडिया @ ७५ अंतर्गत विविध कार्यक्रम राबवावयाचे असून स्वातंत्र्य लढा, संकल्प, संकल्पना, साध्य व कार्यवाही या बाबींवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी. स्वातंत्र्य चळवळींशी संबंधित व्यक्तिमत्त्वांचा इतिहास जतन करणे, पथनाट्य, महानाट्य, चर्चासत्र, प्रदर्शन मेळावे, लोककलेचे सादरीकरण या कार्यक्रमांचे लोकसहभागातून आयोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो घेण्यात यावा, असे त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Each department should discharge its responsibilities properly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.