कमवा व शिका अन् जीवन घडवा
By admin | Published: August 5, 2015 01:55 AM2015-08-05T01:55:51+5:302015-08-05T01:55:51+5:30
ऊमेद अभियानातून रोजगाराच्या संधी$$्निेगोंदिया : ‘कमवा व शिका’ या योजनेतून ग्रामीण भागातील होतकरू बेरोजगार युवकांना उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहे.
गटविकास अधिकारी जमईवार : ऊमेद अभियानातून रोजगाराच्या संधी$$्निेगोंदिया : ‘कमवा व शिका’ या योजनेतून ग्रामीण भागातील होतकरू बेरोजगार युवकांना उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहे. या संधीचा योग्य फायदा घेऊन आपले जीवन चांगले घडवावे, असे मत अर्जुनी-मोरगावचे गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी व्यक्त केले.
अर्जुनी मोरगाव येथे रोजगार मेळावा पार पडला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून एमपीटीएचे स्मितेश उंडाळे, एमपीटीएचे प्रदीप सोनवने, निलेश नितनवरे, अभिषेक बेलवनकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख, तालुका अभियान व्यवस्थापक योगिता हटोलकर यांची उपस्थिती होती.
जमईवार पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुलांना आपल्या आर्थिक समस्येमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. याचा परिणाम अशा मुलांना कोणत्याही प्रकारचे तांत्रिक ज्ञान व कौशल्य आत्मसात नसल्याने नोकरी मिळत नाही. याकरिता एमपीटीव्दारे रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेद्वारे जिल्ह्यातील मुलांना रोजगारासोबत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. दहावी, बारावी व आयटीआय पास मुला-मुलींसाठी बीएससी एन इंडस्ट्रीयल सायन्स ही पदवी संबंधित मुलांना पुढील चार वर्षात प्राप्त होणार आहे. कंपनीमध्ये काम करताना किमान सात हजार ते नऊ हजार ५०० रुपयांपर्यंत विद्यावेतन देण्यात येणार आहे. संबंधित मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त होणार आहे. पदवी प्राप्त होताच अशा अनुभवी उमेदवारांना त्याच कंपनीमध्ये चांगल्या नोकरीची संधी प्राप्त होणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
प्रास्ताविक प्रकाश फूलकुवर यांनी तर आभार विजय भुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनिष पटले, नासीर शेख, निशांत बंसोड, राजेश बारसागडे, सुरेंद्र भावे, वीणा सांगोडे, अमित सिंगरौरे, प्रणिता नकाशे व रिता दडमल यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)