अपंग मतदारांसाठी सुलभ निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:28 PM2018-11-28T22:28:49+5:302018-11-28T22:30:07+5:30
प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रि येबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने ३ डिसेंबरला अपंग दिन साजरा करणेबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याचे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
सुलभ निवडणूक जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करुन अपंग नव मतदारांचे सत्कार कार्यक्रमाचे साजरा करण्याचे निर्देश त्यांनी आयोजित बैठकीत दिले.
हा कार्यक्र म प्रत्येक विधानसभा मतदार संघात राबविण्यात येणार असून तालुकानिहाय मतदार केंद्र स्तरावर, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व बुथ अधिकारी यांना राबविण्याचे निर्देश दिले आहे. ३ डिसेंबरला प्रत्येक बुथ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन नोंदणी झालेल्या अपंग मतदरांना निवडणूक प्रक्रि येत सहभागी होण्याबाबत तसेच मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा संदर्भात माहिती देऊन अपंग नव मतदारांचे सत्कार करु न अपंग दिन कार्यक्रम घेण्याची सूचना केली.
अपंग मतदारांसाठी विविध शैक्षणिक संस्थामध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना बलकवडे यांनी दिले. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटक महत्वाचा असून या वेळेस सुलभ निवडणुकांची तयारी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.