भाकरी कमी खा, पण भावी पिढीला शिक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:28+5:302021-08-21T04:33:28+5:30
गोंदिया : लोधी समाज हा असा समाज आहे जो शेतात काबाडकष्ट करतो. यामुळे शिक्षणाकडे पुरेसे लक्ष देत नाही. मात्र ...
गोंदिया : लोधी समाज हा असा समाज आहे जो शेतात काबाडकष्ट करतो. यामुळे शिक्षणाकडे पुरेसे लक्ष देत नाही. मात्र शिक्षणाशिवाय तरणोपाय नसून भाकरी कमी खा, पण भावी पिढीला अगदी कठीण परिस्थितीतही शिक्षण क्षेत्रात पुढे घेऊन येण्यास प्रोत्साहन द्या. यासाठी तुम्हाला तुमच्या अधिकारांची जाणीव असणे गरजेचे आहे. यामुळे लोधी समाजाचे कल्याण फक्त भारतीय राज्यघटनेनेच होऊ शकते, असे प्रतिपादन बौद्ध भदंत प्रा. डॉ.चंद्रकित्ती यांनी केले.
अमर शहीद वीरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी जयंतीनिमित्त तालुक्यातील ग्राम सहेसपूर येथे आयोजित राणी अवंतीबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिमा दानदाता लोधी शिव नागपुरे, महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आचार्य पूरणसिंह, राष्ट्रीय प्रवक्ते अभियंता मुनेश लोधी, राष्ट्रीय सचिव लोधी मुनेंद्र सिंह नरवरिया, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, राष्ट्रीय महिला संघटक शीला नागपुरे, महिला सशक्तीकरण संघाच्या सरोज राजवर्धन, सुरेखा प्रसन्नजित, प्रिया शहारे, पौर्णिमा नागदेवे, पुरुषोत्तम मोदी, उमेश दमाहे, सरपंच हितेश पताहे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिव नागपुरे यांनी, स्वातंत्र्याच्या लढ्यात राणी अवंतीबाई लोधी यांचे बलिदान शतकानुशतके विसरता येणार नाही, असे मत व्यक्त केले. आचार्य पुरणसिंह यांनी लोधी समाजाचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत स्वागत गीत, लेझिम सादर केले. तसेच मुलामुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. संचालन नागपुरे यांनी केले. आभार गावातील ज्येष्ठ नागरिक चैनलाल नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पुतळा अनावरण समितीचे अध्यक्ष चैनलाल नागपुरे, घनश्याम पताहे, राजकुमार पताहे, रोशनलाल नागपुरे, युवराज बिरनवार, हंसलाल पताहे, महिला समितीच्या अध्यक्ष शेषाबाई पताहे, रेणुकाबाई नागपुरे, जयवंता नागपुरे, कविता मोहारे, दुर्गेश्वरी नागपुरे, लीला बिरनवार यांनी सहकार्य केले.
.....