परंपरागत व्यवसायाला ग्रहण

By admin | Published: April 12, 2015 01:36 AM2015-04-12T01:36:17+5:302015-04-12T01:36:17+5:30

थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

Eclipse of traditional business | परंपरागत व्यवसायाला ग्रहण

परंपरागत व्यवसायाला ग्रहण

Next

गोंदिया : थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यांचा परंपरागत व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
उन्हाळ््यात जिवाची लाहीलाही होत असताना माठातील शितल जल अमृताप्रमाणे असते. गरिबांचा फ्रिज म्हणून पहिली पसंती माठाला असते. परंतु माठ घडविणारा समाज आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहे. उन्हाळ््यात थंडगार पाणी मिळावे म्हणून कुंभार समाज माठ तयार करतो. माठ घडविण्यासाठी कुंभाराला गरम भट्टीचे व शासन तथा समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागत आहे.
बारा बलुतेदारांपैकी एक असा हा समाज आहे. परंपरा जोपासत पूर्वजांपासून चालत असलेला आपला व्यवसाय पुढे चालवित आहे. मात्र अलिकडे त्यांची ही कला शासनाच्या उदासीनतेत सापडली आहे. अ‍ॅल्युमिनियम, स्टील, पितळ आणि प्लास्टिकच्या अनेक वस्तु बाजारात उपलब्ध असल्याने मातीची काही गृहोपयोगी भांडी नामशेष झाली आहेत. परंतु थंड पाण्यासाठी असलेला माठ आजही गरिबांचा फ्रिज म्हणून वापरात आहे.
शेतकऱ्यांना शेतात पिकविणे माहीत आहे. परंतु विकणे माहीत नाही. त्याचप्रमाणे कुंभार समाजाला फक्त माठ बनविणे माहीत आहे. परंतु त्याहून मोठया आर्थिक लाभाचा मार्ग अवगत नाही. या माठ व्यवसायात इतर जाती समुहाचे विक्रेते तयार झाले आहेत. कुंभार समाजात शिक्षणाचा प्रसार अत्यल्प असल्याने संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे. दिवसभर कामामुळे आपल्या मुलांकडे त्यांना लक्ष देता येत नाही. मार्गदर्शनाचा अभाव व आईवडीलांची कसरत पाहून मुले शिक्षणापासून वंचित राहून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी समाजातील मुले शिक्षणापासूनच दूरच राहतात. त्यामुळेच वडिलांच्या हाताला हात लावत तेही याच व्यवसायात अडकून राहतात.
या व्यवसायात इंधनासाठी लागणारी लाकडे व माती हेच साहित्य महत्वाचे असले तरी वन कायद्यामुळे तेही आज दुर्मिळ झाले आहेत. जीवन जगण्यासाठी समाजाकडे दुसरा व्यवसाय नाही. समाजबांधव शेती करतात. अनेकजण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Eclipse of traditional business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.