मालवीय शाळेत ईको फ्रेंडली गणेश विसर्जन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:12+5:302021-09-21T04:32:12+5:30
गोंदिया : नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्याकरिता तसेच नदी-नाले व तलावात होणाऱ्या प्रदूषणावर ...
गोंदिया : नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्याकरिता तसेच नदी-नाले व तलावात होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्याकरिता गणेश विसर्जनाची ईको फ्रेंडली व्यवस्था करण्यात आली होती. या अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील मालवीय शाळेत तयार केलेल्या टँकमध्ये परिसरातील १२१ गणपत्ती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभावना आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवादरम्यान विविध नियमांचे पालन करण्याचे निर्देश गणेश मंडळांना दिले होते. तसेच शासनाने गणेश विसर्जनात काढण्यात येणाऱ्या मिरवणूक व डीजे आदींवर बंदी लावली होती. तसेच बाप्पांचे विसर्जन साध्या पद्धतीनेच करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. याकरिता नगर परिषद प्रशासनाने शहरातील नगर परिषदेच्या शाळांमध्ये ईको फ्रेंडली गणेश विसर्जनाची व्यवस्था केली होती. विसर्जनाकरिता नगर परिषदेने त्यांची व पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. नगर परिषदेने गणपती बाप्पांच्या विसर्जनाकरिता नगर परिषदेच्या शाळांमध्ये टँक उभारून त्यात पाण्याची व्यवस्था केली होती.
याच टँकमध्ये लहान गणेश मंडळातील व घरगुती गणपतींचे विसर्जन करण्याची सोय करण्यात आली होती. या अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील नपच्या मालवीय प्राथमिक शाळेत तयार करण्यात आलेल्या पाण्याचा टँकमध्ये परिसरातील गणेश उत्सव मंडळ व घरगुती १२१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बाप्पांच्या विसर्जनाकरिता नगर परिषदेचे कर्मचारी प्रवीण गढे, दुर्गेश शर्मा, मदन बघेले, अमन कुमार, पोलीस कर्मचारी श्यामकुमार कोरे, पंकज चौरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. विसर्जनासाठी श्री युवा मानव सेवा दलाचे राजेश वाढई, सुनील रोकडे, पंकज मिश्रा, राजेश अग्रवाल, विक्रांत मिश्रा, राहुल वाढई, छोटू अग्रवाल, आनंद शर्मा, लक्की दवारे, लक्ष्मण कावळे, विक्की बांगडकर आदींनी सहकार्य केले.