आर्थिक बळकटीनेच समाजाची उन्नत्ती शक्य ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:28+5:302021-01-13T05:14:28+5:30
आमगाव : बचतीच्या सवयीमुळे कुटुंबात आर्थिक संकटाला तोंड देण्यास मदत मिळते. अशात समाजाच्या सहकार्यातून गटाची स्थापना केल्याने ...
आमगाव : बचतीच्या सवयीमुळे कुटुंबात आर्थिक संकटाला तोंड देण्यास मदत मिळते. अशात समाजाच्या सहकार्यातून गटाची स्थापना केल्याने समाजाची उन्नत्ती शक्य आहे,असे प्रतिपादन नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष शरद पुंडकर यांनी केले.
नाभिक समाज व बार्बर असोसिएशनच्यावतीने बचतगट स्थापना सभेत प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुकाराम चावके, विदर्भ विभागीय उपाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे तर प्रमुख वक्ता म्हणून गुरुदास येडेवार, जिल्हा सहसचिव प्रवीण तयकर,बार्बर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष रंजीत गणोरकर, तालुका महिलाध्यक्ष संगीता वाटकर, जिल्हा कार्यकारणीचे सतीश साखरकर, संत सेनाजी महाबचतगटाचे अध्यक्ष सुनील क्षीरसागर, समाजसेविका जयश्री पुंडकर उपस्थित होते.यावेळी संत सेनाजी महाबचत गटाचे गठन करण्यात आले. याप्रसंगी साखरकर यांनी, बचतगटाच्या माध्यमातून नाभिक समाजबांधवाना संकटाच्या वेळेस त्यांचाच पैसा त्यांनाच वेळेवर कामात येतो असे सांगितले. तसेच केशकला आर्थिक महामंडळाबाबत माहिती दिली. सभेत संदीप गणोरकर, सुरेश कडूकार, ओमकार खडसिंगे, गिरधर गणोरकर, निखिल लक्षणे, नरेंद्र वाटकर, आशा साखरकर, लता गणोरकर, नेहा गणोरकर, शेखर लक्षणे, सुनील शेंडे, राधेश्याम चावके, दीपक शिवणकर, चंद्रकुमार सुर्यवंशी, सुरेंद्र फुंडे, जितेंद्र फुंडे, जागेश्वर फुंडे, लक्ष्मीकांत फुंडे, भूमेश्वर लक्षणे, राजेश लक्षणे, जितेंद्र लिंगे, संतोष चिंचुलकर, जीवन शेंडे, अंकुश सूर्यवंशी, दिनेश मेश्राम, उमेश मेश्राम उपस्थित होते. संचालन महेश गणोरकर यांनी केले. आभार लिंगे यांनी मानले.