शिक्षण विभागाचे मिशन झिरो पेंडन्सी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:31+5:302021-03-20T04:27:31+5:30

आमगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका आमगावची सहविचार सभा अनिल टेंभूर्णीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. सभेला ...

Education Department Mission Zero Pendency () | शिक्षण विभागाचे मिशन झिरो पेंडन्सी ()

शिक्षण विभागाचे मिशन झिरो पेंडन्सी ()

Next

आमगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका आमगावची सहविचार सभा अनिल टेंभूर्णीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली.

सभेला संचालक एन. बी. बिसेन, माजी संचालक संजय जोगी, उपाध्यक्ष वाय. आय. रहांगडाले, जिल्हा संघटक एस. टी. भालेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, जिल्हा कार्यालयीन चिटणीस बी. एस. केसाळे, यू. जी. हट्टेवार, सुरेश कटरे, कार्याध्यक्ष चिटणीस एन. जी. कांबळे, ए. एन. खरडकर, रवींद्र खापर्डे, शोभेलाल ठाकूर, गणेश लोहाडे, जलाराम बुद्देवार, अंजन कावळे, रावसाहेब शिदने, मनोज खुरपुडे, मार्गदर्शक अंबर बिसेन, जी. पी. शहारे, ओमप्रकाश भुते, जीवन हरिणखेडे, महेंद्र कुथे, डी. बी. सोनवाणे, भाऊसाहेब शिरसाट, राम सोनटक्के, राजेश जैन, दिलीप होटे, कविता चक्रवर्ती, देविमाला पटले, गुणवंता नेवारे, कविता मेश्राम, दिलीप कुरूटकर, दिनेश डोंगरे, सुरेंद्र मेंढे, आनंद येरणे, रूपेश चौधरी, रामेश्वर बागडे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सन्मान सावित्रीच्या लेकीचा या उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षिका सुनंदा शंभरकर यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सभेत झिरो पेंडन्सी उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवड श्रेणी व चटोपाध्याय वेतन श्रेणीचे प्रस्ताव जि.प.ला अविलंब पाठविणे, परीक्षा पूर्व परवानगी व कार्योत्तर परवानगीचे प्रस्ताव जि.प.ला पाठविणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके त्वरित निकाली काढणे, मूळ व दुय्यम सेवापुस्तिका अद्ययावत करणे आदी शिक्षकांच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. पंचायत व जिल्हास्तरावर शिष्टमंडळ चर्चासत्र आयोजित केले जाणार, असे सर्वानुमते ठरले.

Web Title: Education Department Mission Zero Pendency ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.