शुल्क देऊन शिक्षण, नको रे बाबा, आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:27+5:302021-07-05T04:18:27+5:30

गोंदिया जिल्ह्यात आरटीईद्वारे फक्त २१ टक्के प्रवेश, राज्यात ३१ टक्केच. वडेगाव : इंग्रजीच्या नावाखाली शिक्षण देणाऱ्या कॉन्व्हेंट आधारित ...

Education by paying fees, no Ray Baba, parents back to RTE admission | शुल्क देऊन शिक्षण, नको रे बाबा, आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ

शुल्क देऊन शिक्षण, नको रे बाबा, आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ

Next

गोंदिया जिल्ह्यात आरटीईद्वारे फक्त २१ टक्के प्रवेश, राज्यात ३१ टक्केच.

वडेगाव : इंग्रजीच्या नावाखाली शिक्षण देणाऱ्या कॉन्व्हेंट आधारित शाळा प्रवेशाकडे विद्यार्थी, पालकांनी पाठ फिरवली असून आरटीई कायद्यांतर्गत शिक्षण शुल्कात सूट मिळूनही विद्यार्थ्यांचे पालक उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्यांपैकी गोंदिया जिल्ह्यातील केवळ २२ टक्के विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेतला आहे. तर राज्यात निव्वळ ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने त्याकडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आरटीईंतर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाच्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. जूनमध्ये अखेर या प्रक्रियेला गती मिळाली. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ३० जूनपर्यंत प्रवेशाची मुदत यापूर्वी दिली होती. आता ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील ९६ हजार ६८४ जागांवरील प्रवेशाच्या सोडतीत जवळपास ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आतापर्यंत त्यातील ३८ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. २९ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित रिक्त जागांकरिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार संधी दिली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रवेशाच्या पोर्टलवर स्वतंत्र सूचना देणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

040721\screenshot_20210704-134718_camscanner.jpg

rte प्रवेश स्थिती दर्शक तक्ता

Web Title: Education by paying fees, no Ray Baba, parents back to RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.