विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघांना शिक्षा

By admin | Published: August 20, 2016 12:53 AM2016-08-20T00:53:52+5:302016-08-20T00:53:52+5:30

विवाहीतेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या तिघांना जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे

Education for three people who are cruel to marriage | विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघांना शिक्षा

विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघांना शिक्षा

Next

पैशाची मागणी : पती, सासू-सासऱ्यांचा समावेश
गोंदिया : विवाहीतेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या तिघांना जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे. यात पती दिनेश कुंभराज कटरे (२७), सासरे कुंभराज कटरे व दिनेशची आई तिघेही रा.सोनेखारी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
दिनेश व त्याच्या घरच्या लोकांनी १७ मार्च २००६ ते १२ डिसेंबर २००९ या काळात लिखेश्वरी दिनेश कटरे (२६) हिचा शारिरिक व मानसिक छळ केला. माहेरून ५० हजार आण म्हणून तिचा छळ करायचे. वांझोटी आहेस असे टोमणे तिला द्यायचे. तिच्या पतीने तिला जभंतीवर आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात तिचा मृत्यू झाला.
सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे माधुरी आनंद यांनी आरोपींना कलम ४९८ अ अंतर्गत ३ वर्षाचा कारावास व २ हजार रूपये दंड, कलम ३०४ अ अन्वये ७ वर्षाचा सश्रम कारवास सुनावला आहे. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. कैलाश खंडेलवाल यांनी काम पाहीले.
तपास आमगावचे तत्कालीन ठाणेदार पी.एम. मायदेशीवार यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या देखरेखीखाली सीएमएस सेलचे हवालदार मनोज फुलसुंगे व ज़तर कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहीले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Education for three people who are cruel to marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.