शिक्षण हे वाघिणीचे दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:24 AM2019-01-24T00:24:40+5:302019-01-24T00:25:54+5:30
सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. अशा कार्यक्रमातून विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात व यातून कौशल्य व बौद्धिक विकास होतो. शिक्षण हे काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व शिवाजी महाराजांचे विचार प्रगट करा.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवााडा : सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. अशा कार्यक्रमातून विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात व यातून कौशल्य व बौद्धिक विकास होतो. शिक्षण हे काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व शिवाजी महाराजांचे विचार प्रगट करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले.
तिरोडा तालुक्यातील ग्राम गोंडमोहाडी येथील आदर्श विद्यालयात आयोजीत स्नेह संमेलनात मंगळवारी (दि.२२) अध्यक्षीयस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन डॉ. योगेंद्र भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून गणेश येळे, डॉ. वसंत भगत, सरपंच पोर्णिमा वळगामे, सुभाष कावळे, जागेश्वर निमजे, परमानंद भगत, शशीकुमार मंडीये, पुडलिंग बोपचे, दिनेश टेकाटे, प्राचार्य अरुण टेंभरे, ठाकरे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. भगत यांनी, विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेकडे वळून देशसेवा व समाजसेवा करावी असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक अरुना टेंभरे यांनी मांडले. संचालन आर.एन. दिघोरे यांनी केले. आभार वाय.एम. पारधी यांनी मानले.
कार्यक्रमासाठी दिपाली मेश्राम, मानकर, प्रगती वैद्य, निशांत बुरडे, दुर्योधन ठाकरे, आदेश चामलाटे, अंजली गौतम, रिना येरले, मालिनी बिसेन, आशिष नागपुरे, ज्ञानेश्वरी ठाकरे, सरिता तिडके आदिंनी सहकार्य केले.