सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचे प्रयत्न
By admin | Published: January 11, 2016 01:36 AM2016-01-11T01:36:56+5:302016-01-11T01:39:15+5:30
आपण सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर महाराष्ट्र शासनाने खरेदी केले.
सामाजिक न्यायमंत्री बडोले : लंजे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयाचे स्रेहसंमेलन
गोंदिया : आपण सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर महाराष्ट्र शासनाने खरेदी केले. अपंगांच्या शाळांना अनुदान दिले. ४० टक्के अपंग असलेल्यांसाठी घरकूल योजना आणली. या विभागाच्या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
वासुदेवराव लंजे प्राथमिक, दामाजी पाटील लंजे माध्यमिक आश्रमशाळा व अशोक लंजे कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.
उद्घाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने संस्थासचिव अशोक लंजे, माजी उपसभापती दामोदर नेवारे, प्रदेश सदस्य लक्ष्मीकांत धानगाये, श्यामराव शिवणकर, रोशन बडोले, डॉ. भुमेश्वर पटले, जगदीश येडे, रतन वासनिक, देवानंद वंजारी, विजय बिसेन, सचिन लंजे उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेच्यावतीने राजकुमार बडोले यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आले. यानंतर ना. बडोले यांच्या हस्ते दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली मीनाक्षी वासुदेव नरोटे व बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेला विकास दिलीप वैद्य, दीपक मधुकर पेटकुले, अक्षय दूधराम वाढई या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हीना भराडे हिने स्वागत गीत सादर केले.
आपल्या प्रास्ताविकात अशोक लंजे यांनी संस्थेच्या विकासाची माहिती दिली. तसेच आश्रम शाळेकरिता पहारेकरी, ग्रंथपाल, सफाई कामगार आदी पदे निर्माण करावे व परिरक्षण अनुदान वाढवावे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे थांबलेले वेतन काढावे, याबाबत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ना. बडोले यांनी आश्वासन देत, आदिवासी विभागाप्रमाणे निवासी शाळा, आश्रम शाळा यांचे जिल्हानिहाय क्रीडा सत्र आयोजित करण्याबाबत विभाग विचार करेल व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून आश्वस्त केले.
संचालन प्रा.व्ही.पी. झोडे यांनी केले. आभार प्रा.आर.वाय. कापगते यांनी मानले. कार्यक्रमासाठी वाय.पी. बन्सोड, व्ही.जी. गणवीर, के.के. पुस्तोडे, आर.एस. दोनोडे, डी.जी. भदाडे, पी.एच. गिऱ्हेपुंजे, एस.ए. राठोड, आर.एच. बाळबुद्धे, जे.पी. नांगलवाडे, जे.टी. बुराडे, जे.टी. चिंधालोरे, व्ही.जी. कोटांगले, बी.एस. निंबेकर, एम.एस. नैकाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)