शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:30 PM2018-02-17T23:30:57+5:302018-02-17T23:31:18+5:30
क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती, आरोग्याची सुविधा व अन्य विकासकामांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असून विकासकामे होत आहेत. मात्र एवढ्यावरच आमचे प्रयत्न संपत नसून क्षेत्रातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती, आरोग्याची सुविधा व अन्य विकासकामांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असून विकासकामे होत आहेत. मात्र एवढ्यावरच आमचे प्रयत्न संपत नसून क्षेत्रातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत २.३४ कोटींच्या निधीतून मंजूर बाजारटोला-चंगेरा रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. आमदार अग्रवाल म्हणाले, एका पाण्यासाठी शेतकऱ्यांचे पीक हातून जात असल्याने शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यालाही पुरेपुर पाणी मिळावे यासाठी कालव्यांच्या दुरूस्तीकरिता आम्ही प्रयत्न केले. परिणामी प्रयत्नांना मंजूरी मिळाली असून येत्या जून महिन्यापर्यंत बाघ प्रकल्पांतील सुमारे ३५० किमी. कालव्यांची दुरूस्ती होणार आहे. असे झाल्यास शेतकरी खरिप व रब्बी दोन्ही हंगामात पीक घेणार व यातून त्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होणार आहे. यापुढे क्षेत्रात विकास कामे करण्यास कठिबध्द असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, रजनी गौतम, प्रकाश रहमतकर, अनिल मते, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, अशोक गोखले, कांता डहाट, आबिद खान, अमृत तुरकर, आशिफ शेख, यादोराव बिसेन, रानी गौतम, मुलचंद देशकर, रेखा डुमरे, कुवरबाई जमरे, सुनंदा चौडे, निर्मला चौधरी, विजया राऊत, मुकेश सुर्यवंशी, ईश्वरदास कावरे, सपना गडपायले, पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.