आठ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:21 PM2018-05-27T22:21:32+5:302018-05-27T22:21:32+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवार (दि.२८) मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण ८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.

Eight million voters will vote for voting | आठ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

आठ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Next
ठळक मुद्दे९३९ मतदान केंद्र : ३१ मे रोजी मतमोजणी, जिल्हा प्रशासन सज्ज, उमेदवारांचे भाग्य होणार मशिनबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवार (दि.२८) मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण ८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीला घेवून मागील दहा बारा दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात चांगलीच धामधूम सुरू होती. ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. पोटनिवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षाचे एकूण १८ उमेदवार रिंगणात आहे.
या सर्व उमेदवारांचे भाग्य सोमवारी मशिनबध्द होणार आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील ९३९ मतदान केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी अशा एकूण ५ हजार १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी १९२४ पोलीस कर्मचारी व १४ अतिरिक्त पोलिसांच्या तुकड्या मागविण्यात आल्या आहे.
जिल्ह्यातील ९३९ मतदान केंद्रावर १०३ सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ मे ला भंडारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीकरीता एकूण १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीचे निरीक्षण करण्यासाठी ८४ सुक्ष्म निरीक्षक, ९६ मतमोजणी पर्यवेक्षक व ९६ मतगणना सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होईल.
मतमोजणीनंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील व्हीव्हीटीपॅट मशिनच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रातील ९३९ मतदान केंद्राची मोजणी होईल.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ३०५, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील २८९, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३४५ केंद्रावर सोमवारी मतदान होणार आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात २० संवेदनशिल मतदान केंद्र आहेत.
१० मतदान केंद्रांचे स्थळ बदलविले
गोंदिया विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या १० मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात आला आहे. इमारतींच्या दुरावस्थेमुळे मतदान केंद्र बदलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. नगर परिषद माध्यमिक हिंदी शाळा मरारटोली मतदान केंद्र क्रमांक १६८, १६९, १७० हे केंद्र बीएचजे आर्ट कॉमर्स कनिष्ठ विद्यालय येथे ठेवण्यात आले होते. नगर परिषद सावित्रीबाई मराठी स्कूल मरारटोली येथील मतदान केंद्र क्रमांक १७१, १७३ मध्ये बदल केला असून हे केंद्र सुध्दा बीएचजे आर्ट कॉमर्स कनिष्ठ विद्यालयात ठेवण्यात आले आहे.तर गुरूनानक इंग्लिश प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक २०८, २०९ हे एस.एस.अग्रवाल म्युनिसिपल गर्ल्स हायस्कूल, सेठ प्रताप मराठी टाऊन स्कूल व मतदान केंद्र क्रमांक २१५, २१७ केंद्र बी.एन.आदर्श सिंधी विद्यामंदिर हायस्कूल आर्ट कनिष्ठ विद्यालय येथे ठेवण्यात आला आहे. नगर परिषद मराठी प्राथमिक स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक २६४ रामनगर येथील नगर परिषद हिंदी प्राथमिक शाळेत स्थानांतरीत करण्यात आला आहे.
मतदान केंद्रावर सोईसुविधांचा अभाव
जिल्हा प्रशासनाने लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ९३९ मतदान केंद्र ठेवले आहे. मात्र मतदान केंद्राची निवड करण्यापूर्वी तेथे योग्य सोईसुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही याची चाचपणी केली नाही. त्यामुळे रविवारी (दि.२७) विविध मतदान केंद्रावर पोहचलेल्या पोलिंग पार्टीतील कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. गोंदिया येथील गोविंदपूर येथील नगर परिषदेच्या शाळेतील केंद्रातील पंखे बंद होते, तर स्वच्छतागृहाची देखील योग्य व्यवस्था नव्हती. त्यामुळे काही कर्मचाºयांनी यावर संताप व्यक्त केला.

Web Title: Eight million voters will vote for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.