आठ महिने लोटूनही कामाला सुरूवात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:49 PM2017-11-07T23:49:28+5:302017-11-07T23:50:04+5:30
तिरोडा शहरापासून अडीच किमी. अंतरावर असलेल्या ग्राम गराडा (काशिघाट तीर्थक्षेत्र) येथे २५ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कोल्हापूरी बंधाºयाचे काम ....
हुपराज जमईवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा शहरापासून अडीच किमी. अंतरावर असलेल्या ग्राम गराडा (काशिघाट तीर्थक्षेत्र) येथे २५ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कोल्हापूरी बंधाºयाचे काम आठ महिने लोटूनही सुरू झालेले नाही. परिसरासाठी वरदान ठरणाºया बंधाºयाचे काम अडकून पडले असल्याने जलसंधारण विभाग किती तत्परतेने कार्य करीत आहे याची प्रचिती येते.
महाराष्ट्र शासनाने जलसंधारण विभागामार्फत या कोल्हापूरी बंधाºयासाठी ३० आॅगस्ट २०११ रोजी ६१.८९ लाख रूपयांची प्रशासकीय मंजूरी दिली आहे. त्यानंतर सन २०१७ मध्ये पलाकमंत्र्यांच्या हस्ते बंधाºयाचे भूमिपूजन झाले. मात्र असे असतानाही अद्याप या बंधाºयाचे काम काही सुरू झाले नाही. सात वर्षांपूर्वी मंजूरी मिळूनही विभागाचे दुर्लक्ष या बंधाºयाला भोवले असेच म्हणावे लागत आहे.
या योजनेचे एकूण पाणलोट क्षेत्र ५२.९८ चौ.मैल असून मुक्त पाणलोट क्षेत्र २२.८३ चौ.मैल आहे. या बंधाºयाची लांबी ४१.२ मीटर असून ५ दारांनी पाणी अडविण्यात येणार आहे. लघु सिंचन (जलसंधारण) विभागाकडे या कामाची जबाबदारी असून सदर विभाग आजही झोपेतच आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते सुनील बारापात्री व गराडा येथील नागरिकांनी केली आहे.
६० हेक्टर क्षेत्राला लाभ
या बंधाºयाचे काम झाल्यास गराडा येथील ६० हेक्टर शेतीला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार असून जमिनीतील भुजळ पातळी व अप्रत्यक्ष सिचंनाचाही लाभ होणार आहे. शिवाय काशिघाट क्षेत्रातील भाविकांना विविध धार्मिक कार्यांकरिता पाण्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.