‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आठ गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 09:26 PM2018-04-21T21:26:15+5:302018-04-21T21:26:15+5:30

शहराप्रमाणेच गावांचा विकास व्हावा व सर्व पायाभूत सुविधा निर्माण करुन आदर्श गावचे स्वप्न साकारावे यासाठी शासनाने ‘स्मार्ट ग्राम’ योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक तालुक्यातील एक, जिल्ह्यातील एक व राज्यातील एका गावची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात येत आहे.

Eight villages in 'Smart Village' competition | ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आठ गावे

‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आठ गावे

Next
ठळक मुद्देसोमवारपासून पाहणी : ‘स्मार्ट ग्राम’ ठरणाऱ्या ग्रामपंचायतला ४० लाखांचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराप्रमाणेच गावांचा विकास व्हावा व सर्व पायाभूत सुविधा निर्माण करुन आदर्श गावचे स्वप्न साकारावे यासाठी शासनाने ‘स्मार्ट ग्राम’ योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक तालुक्यातील एक, जिल्ह्यातील एक व राज्यातील एका गावची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात येत आहे. सन २०१८ या वर्षात तालुक्याचे मुल्यमापन झाले असून त्यातील आठ गावे जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आली आहेत.
हिवरेबाजार या आदर्श गावचे चित्र राज्यातील प्रत्येक गावांमध्ये निर्माण व्हावे, गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, तेथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन ती गावे ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून ओळखली जावित यासाठी शासनाने २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम’ योजना सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातून १ स्मार्ट ग्राम आणि निवड केलेल्या तालुक्यातील गावांपैकी एका गावची जिल्हास्तरावर ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड केली जात आहे.
तालुकास्तरावर ‘स्मार्ट ग्राम’ला प्रत्येकी १० लाख रुपये तर जिल्हास्तरावर निवड केलेल्या ‘स्मार्ट ग्राम’ला ४० लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात येत आहे. ‘स्मार्ट ग्राम’ झालेल्या गावांमध्ये पर्यावरण समृद्धी योजना, गांडूळ व कंपोस्ट खत निर्मिती, सौर उर्जेवर पथदिवे, गावातील रस्त्यांचे सिमेंटीकरण, आठवडीबाजाराचा विकास, गावातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा यासह इतर कामे केली जाणार होती.
या कामांसाठी लागणारा निधी ‘स्मार्ट ग्राम’ला पुरस्कार स्वरुपात मिळालेल्या रकमेतून केला जाण्याचा सरकारचा माणस आहे.
मागील वर्षाची पुरस्कार रक्कम मिळाली नाही
सन २०१७ मध्ये निवड झालेल्या ‘स्मार्ट ग्राम’ला १ मे रोजी महाराष्टÑ दिनाच्या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार होते. पण, पुरस्कारासाठी लागणारा निधी ग्रामविकास विभागाने उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासून ‘स्मार्ट ग्राम’ ठरलेल्या गावातील गावकरी पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही शासनाने पुरस्काराच्या रकमेबाबत कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मागील वर्षी ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेले सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा गाव निधीपासून वंचीत असून निधी अधावी ‘स्मार्ट ग्राम’चे स्वप्न अधुरेच आहे.
ही गावे आहेत स्पर्धेत
‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत उतरलेल्या गावांचे तालुकास्तरावर मुल्यमापन करण्यात आले. यामध्ये, आमगाव तालुक्यातून वळद हे गाव प्रथम आले. देवरी तालुक्यातील भागी-शिरपूर, सालेकसा तालुक्यातील झालीया, गोरेगाव तालुक्यातील मलपूरी, तिरोडा तालुक्यातील पांजरा, गोंदिया तालुक्यातील मुंडीपार-ढाकणी, सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगले व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिरेगावबांध या गावांचा समावेश आहे. या यावांची तपासणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय चमू २३ एप्रिल रोजी आमगाव, सालेकसा व देवरी तालुका, २४ एप्रिल रोजी सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुका व २५ एप्रिल रोजी गोरेगाव, तिरोडा व गोंदिया तालुक्याचे मुल्यमापन करणार आहे. या मुल्यामापनात तालुकास्तरावर प्रथम आलेल्या आठ गावांचे मुल्यमापन जिल्हास्तरावर करण्यात येईल.

तालुकास्तरावर प्रथम आलेली गावे जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आहेत. प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाºया गावांचे मुल्यमापन करून परिशिष्ट ‘अ’ मध्ये असलेल्या निकषांच्या आधारावर मुल्यांकन करून ‘स्मार्ट ग्राम’ निवडले जाईल.
- राजेश बागडे
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.गोंदिया.

Web Title: Eight villages in 'Smart Village' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.